District Superintendent Shrikant Dhiware along with the police officers present during the interrogation of the suspected robbery suspect. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : लुटीतील फरारी आरोपीला एलसीबी पथकाकडून अटक; गावठी कट्टयासह काडतुस जप्त

Dhule Crime : लुटीच्या गुन्ह्यात तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला एलसीबीच्या पथकाने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : लुटीच्या गुन्ह्यात तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २५ हजारांचा गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले. धमणार (ता. साक्री) येथील मोहन रघुनाथ सोनवणे २८ जुलै २०२२ ला धुळे शहरातील बारापत्थर चौकाकडून बस स्थानकाकडे पायी जात होते. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी सोनवणे यांच्या हातातील सव्वातीन लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. (absconding accused in robbery was arrested by LCB team )

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात पूर्वी मनोज उर्फ खुशाल मोकल (रा. दंडेवालाबाबा नगर, मोहाडी, धुळे) यास अटक करण्यात आली. दुसरा संशयित मुजाहीद शेख उस्मान खाटीक (वय २२, रा. आझादनगर, धुळे) हा गुन्हा घडल्यापासून परराज्यात पळून गेला होता. एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना सोमवारी (ता. १०) मुजाहीद शेख उस्मान खाटीक हा धुळे बसस्थानक परिसरात गावठी कट्ट्यासह हिंडत असून, मध्य प्रदेशात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

एलसीबीच्या पथकाने त्याला बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडील २५ हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल, हजार रूपयांचे जिवंत काडतुस जप्त केले. पोलिस शिपाई निलेश पोतदार यांच्या फिर्यादीनुसार मुजाहीद शेख उस्मान खाटीक याच्यावर गुन्हा दाखल केला. पूर्वी चाळीसगाव रोड, जिल्हा पेठ पोलिस ठाणे, जळगाव, धुळे शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरूध्द प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार संतोष हिरे, प्रकाश सोनार, रवीकिरण राठोड, निलेश पोतदार, हर्षल चौधरी, गुणवंत पाटील, सुशील शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT