Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून गोळीबार; रामपुरा फाटा परिसरात तीन जखमी

Latest Crime News : संशयितांनी ठासणीच्या बंदुकीतून गोळीबार केला. अतिक्रमित वनजमिनीवर ताबा मिळविण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : तालुक्यातील कोडीद-पानसेमल रस्त्यावरील रामपुरा फाटा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना १ ऑक्टोबरला दुपारी घडली. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले. संशयितांनी ठासणीच्या बंदुकीतून गोळीबार केला. अतिक्रमित वनजमिनीवर ताबा मिळविण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. (Firing over encroached forest land dispute)

रामपुरा फाट्यावर दोन गटांत दुपारपासून वाद सुरू होता. त्यात लाठ्या, काठ्या व कुऱ्हाडींचा वापर झाल्यामुळे धरमसिंह शंकर पावरा (वय ३५) आणि राजल्या मुरल्या पावरा (वय ४२, दोघे रा. आंबाडूक, ता. शिरपूर) जखमी झाले. त्यांना १ ऑक्टोबरला सायंकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तिसरा जखमी महेंद्रसिंह रंधे (वय ५७) बुधवारी (ता. २) सकाळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या शरीरात छर्रे शिरल्याने जखमा झाल्या आहेत. प्रतिस्पर्धी गटाने ठासणीच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची माहिती त्याने दिली. (latest marathi news)

घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, हवालदार मोहन पाटील, रणजित वळवी, संदीप ठाकरे, पाठक, संजय चव्हाण, धनराज गोपाळ आदी घटनास्थळी दाखल झाले. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

गधडदेव, आंबाडूक व रामपुरा परिसर अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून नेहमीच धुमसत असतो. काही महिन्यांपूर्वीच पोलिस आणि वन विभागाने संयुक्त कारवाई करून मध्य प्रदेशातील टोळीचे अतिक्रमण उद्‍ध्वस्त केले होते. मात्र, अतिक्रमण करून वनजमिनीचा ताबा मिळविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. पोलिसांनी तेथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT