Fraud Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fraud Crime News : तिघा बहिणींची फसवणूक; भावासह 10 जणांवर धुळ्यात गुन्हा दाखल

Crime News : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रावर वारसदार असतानादेखील दुसऱ्या महिलांना परस्पर उभे करून बनावट दस्तऐजव तयार करत तिघा बहिणींची फसवणूक झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fraud Crime News : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रावर वारसदार असतानादेखील दुसऱ्या महिलांना परस्पर उभे करून बनावट दस्तऐजव तयार करत तिघा बहिणींची फसवणूक झाली. याप्रकरणी भावासह दहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Dhule Fraud Crime of three sisters case registered news)

याबाबत सुमन सुरित्राम पाटील (वय ६४, रा. कुंडाणे, ता. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुंडाणे येथील जमीन गट क्रमांक १०३/१/अ क्षेत्र एक हेक्टर २४ आर, गट क्रमांक १०३/२ क्षेत्र एक हेक्टर २० आर, तसेच गट क्रमांक १०३/३ क्षेत्र एक हेक्टर २० आर हे सुमन पाटील यांचे वडील रामचंद्र पाटील यांच्या नावे आहे.

त्यांचे निधन झाल्यानंतर रितसर श्रीमती पाटील आणि त्यांची बहीण साळुंकाबाई, कासूबाई हे वारसदार असतानाही परस्पर तिघींच्या जागी रुकमाबाई मोतीराम पाटील, भटाबाई कौतिक पाटील, चंद्रभागाबाई वल्लभ पाटील यांना वल्लभ रामचंद्र पाटील यांनी उभे केले. त्या तिघी बहिणी असल्याचे भासवून त्यांचे बनावट आधारकार्ड तयार करून बोगस अंगठ्यांचे ठसे घेऊन बनावट छायाचित्रे डकवून फसवणूक केली.  (latest marathi news)

साक्षीदार म्हणून भरत वलभ पाटील, गणेश भाईदास पाटील, राजेंद्र मोतीराम पाटील, बापू मोतीराम पाटील, किसन कौतिक पाटील व धनराज कौतिक पाटील यांनी खोट्या स्वाक्षऱ्या‍ करून फसवणूक केली. त्यानुसार भावासह संशयित दहा जणांवर गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT