MLA Kashiram Pawara, Bhupeshbhai Patel, DYSP Sachin Here and office bearers during the Mahaarti of Shri Khanderao Maharaj. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : येळकोट येळकोट जय मल्हार..! शिरपूर येथे श्री खंडेराव यात्रेला सुरवात

Dhule News : ‘सदानंदाचा येळकोट... खंडेराव बाबा की जय’च्या गजरात येथील २७२ वर्षांची परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेला शनिवारी (ता. २४) सुरवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : ‘सदानंदाचा येळकोट... खंडेराव बाबा की जय’च्या गजरात येथील २७२ वर्षांची परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेला शनिवारी (ता. २४) सुरवात झाली. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले. विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. (Dhule Shri Khanderao Yatra begins at Shirpur marathi news)

अरुणावती नदीकाठावरील मंदिरात खंडेराव महाराजांची व यात्रेची महाआरती आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, डीवायएसपी सचिन हिरे, निरीक्षक के. के. पाटील, पीपल्स बँकेचे अध्यक्ष योगेश भंडारी, पालिकेचे अभियंता माधव पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हसवानी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

महाआरतीनंतर श्री खंडेराव बाबा विकास संस्थानच्या सेवकांसह यात्रेच्या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार पावरा, भूपेशभाई पटेल, बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले. संजय आसापुरे यांनी प्रास्ताविक, तर मनोहर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकड यांनी आभार मानले. कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, कोशाध्यक्ष किरण दलाल, सचिव गोपाल मारवाडी व विश्वस्तांनी संयोजन केले. (Latest Marathi News)

पशू मेळाव्याचे उद्‍घाटन

श्री खंडेराव यात्रेनिमित्त येथील बाजार समितीच्या आवारात पशू बाजार भरविण्यात आला आहे. आमदार काशीराम पावरा, भूपेशभाई पटेल, के. डी. पाटील, बबनराव चौधरी, मिलिंद पाटील, नरेंद्रसिंह सिसोदिया आदींच्या उपस्थितीत पशू मेळाव्याचे उद्‍घाटन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT