Municipality team while sealing the tax collection issue. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : करवसुलीप्रश्‍नी 3 गाळे मनपा पथकाकडून ‘सील’!

Dhule Municipality : महापालिकेच्या करवसुलीसंदर्भात जप्ती पथकाने गल्ली क्रमांक चार आणि बारापत्थर भागात बुधवारी (ता. २१) कारवाई करत तीन गाळे सील केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : महापालिकेच्या करवसुलीसंदर्भात जप्ती पथकाने गल्ली क्रमांक चार आणि बारापत्थर भागात बुधवारी (ता. २१) कारवाई करत तीन गाळे सील केले. शिवाय एकाची नळजोडणीही खंडित केली. संबंधित गाळेधारकांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी थकीत कर भरणा न केल्याने ही कारवाई करण्यात आली.

शहरासह हद्दवाढ भागात अनेक मालमत्ताधारकांकडे कर थकाबाकी असल्याने महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या आदेशाने जप्ती पथके नेमण्यात आली आहेत. (Dhule Tax collection)

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्या नियंत्रणाखाली व उपायुक्त शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथकाने कारवाई केली. शहरातील गल्ली क्रमांक चारमधील चाणक्य डेव्हलपर्सचे आबा पाटील यांचा गाळा सील करण्यात आला.

त्यांच्याकडे एक लाख पाच हजार ८६ रुपये थकबाकी असल्याने व वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.

नंतर बारापत्थर येथे मोहम्मद रमजान सिराज अहमद यांच्याकडे ७५ हजार २७४ रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचे दोन गाळे सील केले. त्यांची नळजोडणी खंडित करण्यात आली. ही कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर वडनेरे, अनिल सुडके, अशोक मंगिडकर यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Paper : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! प्रश्नपत्रिका आता फक्त ३-४ पानांचीच, मंडळाची १८ कोटींची बचतही होणार

ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

IPL 2026 फायनलनंतर मोठी घटना! गुजरात टायटन्सच्या बसला आग, वाचा नेमकं काय घडलं?

Shirdi: एसटी-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, ११ जखमी; लेकीच्या वाढदिवसाला निघालेल्या वडिलांसह काकावर काळाचा घाला

Latest Marathi News Update : मान्सून लांबणीवर, राज्यात आजपासून वादळी पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT