faceshield 
उत्तर महाराष्ट्र

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले फेसशिल्ड!

सकाळवृत्तसेवा

भुसावळ : एकीकडे देशभर कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या आणि थेट कोरोनाबाधित व संशयित व्यक्तींशी संपर्क येणाऱ्या व्यक्तींसाठी फेस शिल्ड बनवले आहे. त्यामुळे कोरोनाचे विषाणू संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचणार नसल्याचे सांगितले जात आहे. 


कोरोना विषाणूने जगातील अनेक देशात प्रवेश केला असून, हजारो लोक त्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना विषाणू हवेवाटे पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंकल्यावर, खोकल्यावर तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधण्याचा सल्ला दिला जातो. वारंवार चेहऱ्याला हात न लावण्याच्या सूचनाही तज्ज्ञांनी दिल्या आहेत. त्यातच मास्कने फक्त तोंडाला संरक्षण मिळते. त्यामुळे बाकी चेहऱ्याच्या भागाला संरक्षण मिळावे म्हणून गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील रोबोटिक्स मधील विश्वविख्यात ब्लॅंका बॉट्स संघाच्या अक्षय जोशी, भूषण गोर्धे, विनय चौधरी, शाहबाझ गवळी, रोहित चौधरी, शुभम झांबरे यांच्यासह ४० विद्यार्थ्यांनी हे फेसशिल्ड बनविले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे, डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा. नितीन खंडारे, प्रा. धिरज पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. 

कमी खर्चात दीर्घकाळ टिकणार 
हे शिल्ड कमीत कमी खर्चात आणि दिवसात बनवले आहे. हा फेसशिल्ड वजनाने हलका असून दीर्घ काळ याचा वापर करता येऊ शकतो. हे फेसशिल्ड बायोडीग्रेडेबल आहेत. रोज ५० फेसशिल्ड तयार करण्यात येत आहेत. हे शिल्ड पोलिस, डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्यकांना उपयुक्त ठरणार आहे म्हणून सुरवातीला विभागीय पोलिस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पोलिसांना वाटप करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT