Crime news sakal
उत्तर महाराष्ट्र

मोबाईल हाताळण्यावरून पत्नीचा गळा चिरून खून; पतीची कबुली

फरारी झालेल्या पतीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : नंदुरबार शहरात दांपत्यामध्ये वाद होऊन दोन दिवसांपूर्वी पतीने चाकूने गळा चिरून पत्नीचा खून केला होता. त्यानंतर फरारी झालेल्या पतीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत शोधून काढत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मोबाईल हाताळण्यावरून वाद झाल्याने संतापात खून केल्याची कबुली दिली.

अरुण सुकलाल नामदास (वय ३६) व रेखा अरुण नामदास (२८) हे दांपत्य शहरातील तुलसीविहार कॉलनी (प्लॉट क्रमांक २२) येथे राहते. २१ जून रात्री ते २२ जूनच्या सकाळी साडेदहादरम्यान पती-पत्नीत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात अरुण नामदास याने पत्नी रेखाचा चाकूने गळा चिरून तेथून पळून गेला. रेखाला शेजारच्या व्यक्तींनी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले होते. अरुण नामदास यांच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील व पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. निरीक्षक कळमकर व उपनगर पोलिस ठाण्याचे भदाणे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करून संशयित आरोपीचा शोध घेण्यास प्रारंभ झाला. अरुण नामदास हा सिंधी कॉलनीतील तमन्ना सुपर शॉपी नावाच्या दुकानात काम करीत असल्याची माहिती मिळाली. तेथे त्याच्याबाबत अधिक माहिती त्याचा फोटो व मोबाईल क्रमांक प्राप्त केला. तसेच थोड्या वेळापूर्वी तो दुकानावर येऊन मालकाकडून ५०० रुपये घेऊन गेल्याचे समजले. संशयित मूळगावी अमळनेर (जि. जळगाव) येथे धुळेमार्गे बसने जात असल्याचे समजले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार बसस्थानकावर जाऊन धुळ्याला जाणाऱ्या बस व खासगी वाहनांची माहिती घेतली असता थोड्याच वेळापूर्वी धुळ्याला बस गेल्याची माहिती मिळाली. पथक धुळ्याकडे रवाना केले. धुळे येथील बसस्थानकावर पोचल्यावर पथकाने परिसरात शोध घेत असताना तो टॅक्सी स्टँडजवळ अमळनेर येथे जाणाऱ्या गाडीजवळ उभा असल्याचे दिसले. त्यास चाहूल लागताच तेथून पळ काढला; परंतु पथकाने अरुणला शिताफीने ताब्यात घेतले. त्यास नंदुरबार येथे आणले. निरीक्षक कळमकर यांनी बोलते केले असता त्याने खून केल्याचे कबुली दिली. तसेच अरुणने घटनेची माहिती सांगितली. त्यात पत्नी रेखाचा मोबाईल हातात घेण्यावरून वाद झाला. त्या रागात रेखा नामदास हिचा धारदार चाकूने गळा चिरून ठार केल्याचे त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT