कापडणे (ता.धुळे) - राज्यव्यापी मसूदा मोर्चा संदर्भात मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी. 
उत्तर महाराष्ट्र

शेतकरी संघटनेचा एक आॅगस्टला राज्यव्यापी मसूदा मोर्चा

जगन्नाथ पाटील

कापडणे (जि.धुळे) - कर्जमाफीबाबत राज्य शासन दररोज नवा शासन आदेश काढीत आहे. शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी नेमके काय करावे हेच शासनाला सुचत नाही. याचे नेमके उत्तर शेतकरी संघटनेकडे आहे.

शेतकर्‍यांची कर्जफेड करण्याची इच्छा आहे. त्यासाठी शेतीमालाला रास्त भाव पाहिजे. यासाठी एक मसुदा संघटना शेतकर्‍यांना देणार आहे. हा मसुदा मोर्चा काढून जिल्हाधिकारी मार्फत शासनाला सादर केला जाणार आहे ;  या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी येथे जिल्ह्यातील मोजक्या कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी माजी अध्यक्ष शांतूभाई पटेल, आत्माराम पाटील, धनराज पाटील, नारायण माळी, बन्सिलाल माळी, जगन चौधरी, डिगंबर पाटील, भगवान पाटील, रामकृष्ण पाटील, छगन पाटील आदी उपस्थित होते.

एक आॅगस्टला राज्यव्यापी मसूदा मोर्चा
एक आॅगस्टला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मसुदा मोर्चा संघटनेतर्फे काढले जाणार आहेत. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना कर्जमुक्तीचा मसुदा दिला जाणार आहे. ते शासनापर्यंत पोहचवितील. नागपूर येथे संघटनेचे राज्यव्यापी बैठक झाली. त्यावेळी निर्णय झाला आहे.

दरम्यान धुळे शहरात एक आॅगस्टला दहाला वीर सावरकर पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. यात सर्वपक्षीय शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रघुवंशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : पुढील ४८ तास महत्त्वाचे ! महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता; 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी

Mumbai Kolhapur Sahyadri Express : सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा कोल्हापूर ते मुंबईपर्यंत सुरू होणार, मध्य रेल्वेकडून माहिती

Latest Marathi News Live Update : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या मोहरमला १७ जूनपासून सुरुवात

नोकरी वाचविण्यासाठी गुरुजींना ‘टीईटी’च्या 10 संधी! राज्यातील पावणेदोन लाख शिक्षक नाहीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण; 31 ऑगस्ट 2028 नंतर ‘ही’ कारवाई

आजचे राशिभविष्य - 05 जून 2026

SCROLL FOR NEXT