sakri-news
sakri-news 
उत्तर महाराष्ट्र

साक्री तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; मजुरांचा शेतात येण्यासाठी नकार       

दगाजी देवरे

धुळे (म्हसदी) - विजापूरपाडा व कावठे (ता.साक्री) येथील शिवारात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.गुरुवारच्या रात्रभर दहशत निर्माण करणा-या बिबट्याने कावठे शिवारात घोडी फस्त केली.बिबट्याच्या दररोजच्या वावरामुळे शेतात वास्तव्यास असणा-या शेतक-यांनी धास्ती घेतली आहे.बिबट्याच्या भीतीमुळे शेतात कांमासाठी मजूरही जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गेल्या मंगळवारी (ता.17) म्हसदी शिवारात बिबट्याने कालवड फस्त केली होती. यानंतर कावठे (ता.साक्री) येथील बाघड्या डोंगरालगतच्या शिवारात हल्ला करत सोमा यसा गोयकर यांची घोडी बिबट्याने फस्त केली. काही दिवसांपूर्वी त्याच शिवारात भिका शाळू  गो-हे यांच्या चार मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या. परिसरात सुमारे दहा ते बारा घरे शेतात बांधलेली आहेत. बिबट्यामुळे शेतक-यांनी रात्र जागून काढली. वनपाल पी.एस.जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पचंनामा केला. बिबट्याचा बंदोबस्त करत शेतकरी कुटुंबाना भयमुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.

मजुरांचा शेतात कामाला येण्यासाठी नकार
दरम्यान,विजापूरपाडा शिवारात सध्या टोमॅटो, गवार, हिरवी मिरची यासारखा भाजीपाला काढला जात आहे. या भागात बिबट्या असल्याच्या भितीने मजूर कामावर येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. भाजीपाला पीकात बिबट्या दबा धरुन बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वन विभागाच्या कार्यलयात बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन पंचायत समितीचे सदस्य उत्पल नांद्रे यांनी दिले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी सोमा गोयकर,दामू गोयकर व भिका साळू हेदेखील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT