b ed admission 
उत्तर महाराष्ट्र

बी.एड्‌ प्रवेश प्रक्रिया..क्षमता असूनही तीन हजाराहून अधिक प्रतिक्षेत

प्रा. डॉ. दीपक बाविस्कर

धुळे : राज्यात शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेत विद्यार्थी क्षमता असतांना देखील नऊ हजारपेक्षा अधीक विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत आहेत. अजूनही तीन हजारपेक्षा जास्त प्रवेश होवू शकतात. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. 
गेल्या दोन महिन्यांपासून सूरू असलेली बी. एडची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बुधवारी (ता. 10) चौथ्या प्रवेश फेरीनंतर संपली. मात्र अद्यापही 3 हजार 192 जागा रिक्त आहेत. 

प्रवेशासाठी सर्वाधीक प्रतिसाद
या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही बी. एड्‌ प्रवेशाचा कल वाढलेला दिसला. राज्यात 496 मान्यताप्राप्त महाविद्यालये असून प्रवेशाची क्षमता 32 हजार 290 आहे. प्रवेशासाठी 46 हजार 817 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. पैकी 39 हजार 919 विद्यार्थी अंतीम प्रवेशाच्या यादीसाठी पात्र होती. त्यातूनही 38 हजार 245 विद्यार्थ्यांनी अंतीम प्रवेश यादी पर्यन्त प्रवेशासाठी प्रयत्न केला. 

दहा टक्के वाढूनही प्रवेशापासून विद्यार्थी वंचीत
बी. एड. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढीव प्रतिसाद पाहता तसेच कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहुन आर्थिक दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांसाठी सामुहिक प्रवेश प्रक्रिया समिती (CET) कडून दहा टक्के जागा वाढून देण्यात आल्या. मात्र या वाढीव जागांची तरतूद प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपासून करण्यात आल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. 
 
अद्यापही होवू शकतात तीन हजापेक्षा अधीकप्रवेश
राज्यात बीएड महाविद्यालयात प्रवेशाची क्षमता 32 हजार 290 असून अद्याप फक्त 29 हजार 098 विद्यार्थी प्रवेशीत झाले आहेत. अर्थात तीन हजार 192 जागा रिक्त आहेत. 38 हजार 245 विद्यार्थी अंतिमयादित असतांना देखील तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहिले. यासाठी अनेक कारणे आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थीना संपर्क न होणे. प्रवेशासाठी कमी मुदत, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडथळा, आर्थिक परिस्थिती तसेच कोरोनाचे संकट ही डोके वर काढत आहे. या साऱ्यांचा विचार करता प्रवेशाची मुदत तसेच कोट्यातील जागांसाठी नियमांची शिथीलता केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी प्राप्त होऊ शकते अशी विद्यार्थी, पालकांची मागणी आहे. 

बीएड प्रवेशासाठी 
एकुण विद्यार्थ्यांची नोंदणी - 46817
पात्र विद्यार्थी - 39919
प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस पात्र विद्यार्थी - 38245
राज्यात महाविद्यालय संख्या - 496
विद्यार्थी जागा - 32290
प्रवेशित विद्यार्थी - 29098
रिक्त जागा - 3192
 
संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT