matichya chuli 
उत्तर महाराष्ट्र

ग्रामीण भागात परत पेटल्या चुली! 

महेंद्र खोंडे

तऱ्हाडी (धुळे) : शासनाद्वारे उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना शंभर रुपयांच्या सवलतीत माफक दरामध्ये उज्ज्वला गॅसजोडणी दिली. परंतु गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडल्याने हा शंभरीतील गॅस आता नाकापेक्षा मोती जड झाला आहे. 
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर या आठवड्यात ६५० रुपयांवर जाऊन धडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, सिलिंडरसाठी एकत्रित रक्कम जमविताना या लॉकडाउनमुळे रोजगार उपलब्ध नसल्याने पैसे जमविताना दमछाक होत आहे. घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकाला मार्चपासून सबसिडी दिली जात नाही. गॅस सिलिंडर खरेदी वेळी पूर्ण रक्कम द्यावी लागते. अनेक वेळा सामान्य नागरिकाकडे एकत्र रक्कम नसते. स्वयंपाक करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक काही वर्षांपूर्वी चूल किंवा स्टोव्हचा वापर करीत होते. परंतु हळूहळू काळ बदलला श्रीमंत व साधारण लोकांच्या बरोबरीने सर्वसाधारण व सामान्य घरातील नागरिकही गॅस कनेक्शन घेण्याकडे वळू लागले. मागील काही वर्षांत शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर गॅस कनेक्शनधारकांची संख्या वाढली आहे. 

गॅस दिला पण चिंतेचे कारण ठरले
ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेतून अनेक गॅस लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकडेही गॅसची सोय झाली. महिलांना सरपणातून निघणाऱ्या धुरापासून मुक्ती मिळावी, ग्राहकांना त्याचे आरोग्य चांगले राहावे, याआधी चुलीवरील स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड-सरपणाचा वापर व्हायचा. त्यामुळे जंगलातील वृक्षतोड कमी व्हावी यासाठी सरकारने गॅस कनेक्शन सवलतीच्या दरात वाटले. परंतु सातत्याने गॅस सिलिंडरच्या किमतीची दरवाढ सामान्यांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. 

सबसिडी बंदमुळे सिलिंडर भरणे टाळताय
शासनाच्या नियमाप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरसाठी अनुदान दिले जाते. ही सबसिडी म्हणजेच अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. परंतु मार्चपासून सबसिडी नाही. सिलिंडरसाठी बुकिंग केल्यानंतर सिलिंडर घेताना एकूण रक्कम ग्राहकांना जमा करावी लागते; परंतु सर्वसाधारण कुटुंबातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या व्यक्तीला एकाच वेळी ही रक्कम भरणे जड झाले आहे. त्यामुळे गॅस कनेक्शन असूनही अनेक ग्राहकांना सिलिंडर खरेदी करणे शक्य होत नाही. पर्यायाने त्यांनी आपला मोर्चा पुन्हा कोळसा, चूल सरपणासारख्या इंधनाकडे वळविला आहे. 
 
गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक आठवड्याला वाढत असून, गृहिणींचे बजेट अक्षरशः कोलमडले आहे. याचाच परिणाम ग्रामीण भागातील बंद केलेल्या चुली परत पेटल्या असून, महिलांना पुन्हा धुराच्या विळख्यात स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. 
-सोनल भामरे, गृहिणी 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT