corona meet 
उत्तर महाराष्ट्र

गावात एकाच दिवशी सात जणांची अंत्‍ययात्रा; कोरोनाचा कहर

विजय बागल

निमगूळ (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावात कोरोनाने थैमान घातले असून निमगुळ गावात २० दिवसात २०६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, ५६ रुग्ण बरे झाले असून बाधित रुग्णापैकी जिल्हा रुग्णालय धुळे, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा, कोरोना सेंटर शिंदखेडा व धुळे, नंदुरबार, दोंडाईचा या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. २० दिवसात जवळपास २२ जण दगावले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यापैकी रविवारी (ता. २१) एकाच दिवसांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

या सर्व परिस्थितीत आरोग्य यंत्रणाने अधिक सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता असल्याची मागणी माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर प्रशासन गतिमानतेने कामाला लागले आहे. डॉ. हितेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. साक्षी कुवर व कर्मचारी वर्ग अथक परिश्रम घेत आहे. निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्याचा मोठा ताण पडत आहे. ती यंत्रणा कमी पडत असल्याची तक्रार आमदार रावल यांच्याकडे करण्यात आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्याना त्याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यानी प्रांताधिकारी विक्रमसिह बांदल व जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले असून गावातील परिस्थितीतचा आढावा घेतला. 

गावातच व्हावे कोरोना सेंटर
प्रांताधिकारी विक्रमसिह बादल म्हणाले, आरोग्य केंद्रातच आरटीपीसीआर टेस्ट करणार असून वय ४५ च्या वरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच दोंडाईचा येथील कामगार भुवन ताब्यात घेतले असून ५० ऑक्सिजनयुक्त बेड अद्यावत करणार असल्याचे सांगितले. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी गावाला भेट दिली कार्यकर्त्यांनी समस्या मांडल्या त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट सुरू करावी व गावात सर्वेक्षणसह फवारणी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान नागरिकांनी तहसीलदार सुनील सैंदाणे यांना कोरोना सेंटर निमगूळ गावातच उभारण्याची मागणी केली. आढावा बैठकीला तहसीलदार सुनील सैदाणे, विस्तार अधिकारी संजय सोनवणे तालुका वैद्यकीय अधिकारी भूषण मोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT