उत्तर महाराष्ट्र

नंदुरबारमधून पुणे, पंढरपूर, नाशिक, धुळे, जळगावसाठी बस

नंदुरबारमधून पुणे, पंढरपूर, नाशिक, धुळे, जळगावसाठी बस

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : अनलॉकनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) (Maharashtra state road transport) नंदुरबार आगारातून सोमवार (ता. ७)पासून पुणे, पंढरपूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव आणि धुळे येथे जाण्यासाठी एसटीच्या (Nandurbar unlock) फेऱ्या सुरू होणार आहेत, अशी माहिती नंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार यांनी दिली. (nandurbar-after-lockdown-parivahan-bus-service-start-nandurbar-depo)

कोरोनाकाळात )Coronavirus) दीड वर्षापासून सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेली एसटीची चाके थांबली होती. १ जूनपासून प्रशासनाने अनलॉक जारी केल्यानंतर एसटी सेवा कार्यान्वित करण्यात आली. नंदुरबार आगारातून सोमवारपासून पुणे सकाळी साडेपाच, पंढरपूर बस पाचला रवाना होईल. नाशिकसाठी सकाळी सहा, सात, आठ, नऊ, दहा, साडेअकरा, साडेबारा, दुपारी अडीच व साडेतीनला, मुक्कामी नंदुरबार- नाशिक मुंगारीमार्गे सायंकाळी सातला सुटेल. नंदुरबार-औरंगाबाद सकाळी आठ आणि दुपारी साडेतीन, नंदुरबार- जळगाव-अमळनेरमार्गे सकाळी पावणेसात व दुपारी सव्वाला धुळेमार्गे धावणार आहे.

धुळेसाठी बावीस बस

धुळ्यासाठी दिवसभरात २२ बस धावणार आहेत. त्यात पहाटे साडेपाच, सकाळी साडेसहा, साडेसात, साडेआठ, नऊ, साडेनऊ, साडेदहा, अकरा, साडेअकरा, दुपारी बारा, साडेबारा, एक, दीड, दोन, अडीच, तीन, साडेतीन व चार, सायंकाळी पाच व सहा आणि सात व रात्री आठला मुक्कामी, नंदुरबार- शहादा सकाळी सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा आणि दुपारी साडेबारा, दीड, अडीच, साडेतीन, साडेचार आणि सायंकाळी पाचला बस सुटणार आहे. नंदुरबार-तळोदा सकाळी साडेसहा, साडेसात, साडेआठ, साडेनऊ, साडेदहा, साडेअकरा, दुपारी साडेबारा, दीड, अडीच, साडेतीन, साडेचार आणि सायंकाळी साडेपाचला बस सुटणार आहे. याशिवाय नंदुरबार-शिरपूर सकाळी साडेसात व दुपारी साडेबारा, नंदुरबार-अक्कलकुवा सकाळी आठ आणि दुपारी एक, तर नंदुरबार-अमळनेर सकाळी आठ, नंदुरबार- नवापूर सकाळी साडेआठ, दुपारी साडेबारा, सायंकाळी पाचला मुक्कामी बस सुटेल.

१५ हजार किमीचे नियोजन

कोरोना नियमावलीचे पालन करत सोमवारपासून ३५ टक्के प्रवाशांच्या उपस्थित सर्व बस सोडण्यात येणार आहेत. तसेच १५ हजार ६५७ किलोमीटरचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी व रविवारी नंदुरबार जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’मुळे बस बंद होत्या. मात्र, १ ते ३ जूनदरम्यान ११ हजार किलोमीटर ५० टक्के क्षमतेने बस धावल्या. या माध्यमातून नंदुरबार आगाराला दोन लाख ८० हजारांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती नंदुरबार आगारप्रमुख पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT