jayant patil 
उत्तर महाराष्ट्र

बलदाणे धरणातून पाटचारीसाठी १४ कोटी मंजूर; जयंत पाटील यांची घोषणा 

जितेंद्र मेखे

शिंदखेड (नंदुरबार) : शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी प्रश्न सुटणार बलदाणे धरणातून पाटचारीसाठी १४ कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 
येथील काकाजी मंगल कार्यालयात राज्याचे जलसंपदामंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा व जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते जयंत पाटील म्‍हणाले की, बलदाणे धरणातून पाटचारीसाठी सुमारे १४ कोटी रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे झालेल्या आढावा बैठक घेऊन शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी मंजूर केले. त्यातून धावडे, झिरवे, निमगुळ, टाकरखेडा आदी गावांना लाभ मिळणार आहे. 

तर शिंदखेडा मतदार संघ जिंकणे सोपे
शिंदखेडा तालुक्यातील मतदारसंघात मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून संदीप बेडसे यांना शिंदखेडा मतदार संघाचा गड जिंकणे सोपे जाईल. यावेळी सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, सक्षणा सलगर, मेहबूब शेख, रुपाली चाकणकर, संदीप बेडसे यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश आदिक, अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शिंदखेडा मतदार संघाचे क्षेत्र प्रमुख संदीप बेडसे, रणजीत भोसले, माजी आमदार रामकृष्ण पाटील, किरण पाटील, सुनील सोनवणे. सत्यजित सिसोदे, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, शहराध्यक्ष प्रवीण पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष अॅड. एकनाथ भावसार, बापू महाजन, युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, युवती जिल्हाध्यक्ष हिमानी वाघ, युवक शहराध्यक्ष गोलू देसले आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT