live 
उत्तर महाराष्ट्र

बहीण-भावांची वीण अधिक घट्ट....कुटे परिवारात 38 भाऊ 45 बहिणींची अनोखी दिवाळी

संजय भागवत

सायखेङा-सध्याच्या पिढीत नात्यांचा ओलावा कमी झाला असुन या पिढीत मामाचे गांव हरवले आहे. पण सायखेडा(ता.निफाङ) येथील कुटे परिवारातील सदस्यांनी एकत्र येत सलग तिसर्या वर्षी सामुहिक भाऊबीज आनंदात साजरी केली. बहीण भावांची विण अधिक घट्ट करणाऱ्या या परिवाराने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

   कुटे परिवारातील जगन कुटे, प्रमोद कुटे, राहुल कुटे, अक्षय कुटे, संजय कुटे, महेश कुटे, सागर कुटे, राजेंद्र कुटे , दिपक कुटे  आदींनी यंदाची भाऊबीज एकत्रित साजरी करण्याची संकल्पना मांडली आणि त्यास  सकारात्मक प्रतिसाद मिळाला . यानिमित्ताने दोन दिवसीय कौंटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले व पाडव्याच्या दिवशी लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तसेच बहीण व दाजी यांनी जीवनातील चांगले वाईट अनुभव यानिमित्ताने सर्वांना सांगितले व एकमेकांची ओळख करून देण्यात आली व दरवर्षी असेच यानिमित्ताने भेटण्याचे ठरले. भाऊबीजच्या दिवशी बहिणींनी सर्व भावांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी ओवाळले व भाऊबीजेचा सामूहिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. याठिकाणी कुटे परिवारातील 38 भाऊ व 45 बहिणींसह १५० सदस्य उपस्थित होते. दरवर्षी अशीच भाऊबीज साजरी करण्याची संकल्प देखील करण्यात आला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT