उत्तर महाराष्ट्र

केळी विक्रेता "वॉटरमॅन'च्या कार्याचे कौतुक 

आकाश धुमाळ

चाळीसगाव : "तापले हे रान, झाडानाही टाकली मान, भागवना नभा माझी तहान...' या कवितेच्या ओळींमध्ये आकाशाकडे पाण्याची आर्त मागणी केलेली दिसून येत आहे. सध्या अशीच काही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या रणरणत्या उन्हात विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना स्वखर्चाने थंड शुद्ध पाणी पाजवणारा शहरातील केळी विक्रेता तरुण कौतुकाचा विषय ठरला आहे. सुमारे नऊ वर्षांपासून ही जलसेवा करणाऱ्या हा केळी विक्रेता "वॉटरमॅन ' बनला आहे. 
सध्या सूर्य आग ओकत असल्याने दररोज कमालीचे तापमान वाढत आहे. खेड्यापाड्यातील नागरिक काही ना काही कामानिमित्त शहरात येत असतात. शहरात ज्या दानशुरांनी आपल्या दातृत्वातून पाणपोई बांधून दिल्या, त्यांची योग्य निगा राखली न गेल्याने त्या आज "शो पीस' ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत दुपारी नागरिकांना पाणी पिण्यासाठी कुठल्या तरी हॉटेलचा किंवा पाणपोई सुरू असेल तर त्याचा आधार घ्यावा लागतो. शहरात लोटगाडीवर दिवसभर हिंडून केळी विकणारा संजय साळुंखे हा तरुण मात्र केळी विकण्यासोबतच नागरिकांची तहान देखील भागवत आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊन येथील रोटरी क्‍लबतर्फे त्याचा गौरव देखील करण्यात आला होता. तहानलेल्यांच्या तृष्णा भागवल्याने मला आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना संजय याने "सकाळ 'शी बोलताना सांगितले. रस्त्यावर जवळपास ज्या ठिकाणी हॉटेल किंवा पाणपोई नसेल अशा ठिकाणी संजय साळुंखेच्या लोटगाडीवरील जारमधील थंड पाणी पिऊन नागरिक तृप्त होतात. त्याच्या या जलसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
एका गल्लीत एक महिला माझ्या समोर चक्कर येऊन पडली. रणरणते ऊन, दुपारची वेळ असल्याने गल्लीतील सर्व घरांचे दरवाजे बंद होते. जवळच एक दुकान सुरू असल्याने धावत जाऊन तेथून मी तत्काळ पाणी बॉटल घेतली व त्या महिलेला पाणी पाजले. तेव्हापासून फिरती जलसेवा करावी, अशी मनाशी खूणगाठ बांधली आणि दररोज पाण्याचे जार गाडीवर ठेवू लागलो. 
- संजय साळुंखे, केळी विक्रेता, चाळीसगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

SCROLL FOR NEXT