उत्तर महाराष्ट्र

कामगाराचा मुलगा बनला ‘टिकटॉक स्‍टार’... तब्बल...दिड लाख फॉलअर्स !

आकाश धुमाळ

चाळीसगाव ः सध्या जगभरातील तरुणाईला वेड लावणाऱ्या ‘टिकटॉक’चा वापर करणारे भारतात नऊ कोटी लोक आहेत. सामान्य माणसाला देखील त्याच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यात ‘टिकटॉक’ हे अॅप कमालीचे लोकप्रिय झाले आहे. यामुळे अनेक जण स्‍टार झाले आहेत. असाच चाळीसगावातील एका कामगाराचा मुलगा ‘टिकटॉक’च्या मदतीने लाखो चाहत्‍यांसाठी ‘स्‍टार’ बनला आहे. 

शहरातील हिरापूर रोडवरील रहिवासी रोहित सोनवणे याचे मातृछत्र लहानपणीच हरपले. बहिणीचे लग्न झाल्याने घरी रोहित व त्‍याचे वडील शिवाजी सोनवणे हेच असतात. घरातील सर्व कामे करून रोहित हा शहरातील चव्‍हाण महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकत आहे. शिक्षण घेत असताना रात्री तो शहरातील एका दवाखान्यातही काम करतो. लहानपणापासून कलेची आवड असल्‍याने रोहित शाळेत होणाऱ्या वेगवेगळ्या नाट्य स्पर्धेत सहभाग घ्यायचा. मात्र, कौंटुंबिक परिस्‍थिती हालाकीची असल्‍याने त्याच्याजवळ बाहेरगावी स्‍पर्धेसाठी जाण्यासाठी पैसे नसायचे. त्यामुळे अनेक मोठ्या नाट्य स्पर्धांना तो मुकला देखील आहे. मात्र, आपल्‍या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणाऱ्या ‘टिकटॉक ऍपची माहिती त्याला मित्रांकडून मिळाली. मित्रांनीच त्याला मोबाईल घेऊन दिल्यानंतर त्‍यावर त्याचे व्हिडिओ तयार करायला सांगितले. त्याचे व्हिडिओ मित्रांमध्येच कमालीचे लोकप्रिय झाले.

त्यानंतर त्याने तयार केलेले व्हिडिओ ‘टिकटॉक’वर अपलोड केल्यानंतर काही दिवसांतच त्याला त्याच्या चाहत्‍यांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतले. रोहितच्या व्हिडिओला सध्या २७ लाखांपर्यंतच्या ‘लाईक’ मिळाल्या आहेत. त्याचे एक लाख ४२ हजार फालोअर्स आहेत. त्‍याने आतापर्यंत पाचशेहून अधिक व्हिडिओ तयार करून ‘टिकटॉक’वर ‘अपलोड’ केले आहेत. त्‍याच्यातील कलागुणांमुळे त्याचा चाहता वर्ग वाढला आहे. अगदी तो रस्त्यावरून जरी फिरत असेल आणि त्याला त्याच्या एखाद्या चाहत्याने पाहिले तर लगेचच त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी ते येतात.

रोहित एवढ्यावरच थांबलेला नाही तर त्याने आता खानदेशी गाण्यावर एक व्हिडिओ तयार केला असून तो ‘युट्यूब’वर आता काम करतो आहे. एका तरुणीला लग्नानिमित्त हळद लावतानाचा एक व्हिडिओ डोळ्यांत पाणी आणणारा असून त्याच्या या व्हिडिओला तब्‍बल ८० लाख दर्शक असून आतापर्यंत ६० हजार लोकांनी तो ‘शेअर’ केला आहे. रोहितच्या या अदाकारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


मला लहानपणापासूनच कलेची आवड आहे. घरच्या आर्थिक परिस्‍थितीमुळे बाहेरगावी जाऊन यासाठीचे शिक्षण घेणे मला शक्य नाही. सध्या ‘टिकटॉक’वरच व्हिडिओ टाकून माझे कलागुण लोकांसमोर मांडत असतो. चित्रपटात काम करण्याचे माझे स्‍वप्‍न आहे. त्‍यासाठी मी प्रयत्‍नशील आहे. 
रोहित सोनवणे, टिकटॉक स्‍टार, चाळीसगाव 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT