ajintha leni 
उत्तर महाराष्ट्र

coronavirus : कोरोनामुळे अजिंठा लेणी पडली ओस

विलास जोशी

वाकोद (ता. जामनेर) : सध्या कोरोना मुळे सर्वदुर परिणाम जाणवत असून, त्याचा फटका सध्या पर्यटन क्षेत्रालाही बसत आहे. अजिंठा लेण्यामधे देखील सद्यःस्थितीला शुकशुकाट झालेला दिसून येत आहे. दोन्ही ठिकाणी पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली असून, देशी पर्यटकासोबत विदेशी पर्यटक देखील धास्तावले आहेत.

मागील वर्षी याच एक महिन्यात विदेशी पर्यटकांची संख्या ४२१८ इतकी होती; तिच संख्या या वर्षी याच कालावधीत हजाराने घटली असून, विशेष म्हणजे कोरोनाची सुरुवात झाल्यापासून चीन चा एकही पर्यटक लेणी मध्ये फिरकताना दिसत नाही. सध्या कोरोनाचा वाढता जोर लक्षात घेता, यापुढे देखील ही संख्या घटण्याची चिन्हे दिसत आहे.

मागील वर्षी १ फेब्रुवारी ते १० मार्च २०१९ या दरम्यान, अजिंठा लेणीस भेट देणारे ४ हजार २१८ परदेशी पर्यटक आले होते. तर यंदा १ फेब्रुवारी ते १० मार्च २०२० दरम्यान ३ हजार २०२ विदेशी पर्यटक आले होते. यावरून विदेशी पर्यटकांनी कमालीची धास्ती घेतलेली जाणवते. यामुळे येथील व्यावसायिकांना देखील याचा फटका होत असून, काही ठिकाणी हॉटेल्स मध्ये आधीच केलेली बुकिंग सुद्धा रद्द केली जात आहे. यामुळे हॉटेल व्यावसायला मोठा फटका बसला आहे. खबरदारी म्हणून लेणीतील कर्मचाऱ्यांना मास्क आणि हॅण्डग्लोज देण्यात आली असल्याची माहिती साहाय्यक संवर्धक डी. एस. दानवे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

Aadhaar Centres Only on Paper: मुळशीतील आधार सेवा केंद्रे केवळ कागदावर; २० पैकी ७ केंद्रे मंजूर ठिकाणीच नाहीत, काहींचा ठाव ठिकाणा प्रशासनालाच नाही

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Urban Heat Mitigation: नियोजनबद्ध वृक्षलागवडीने भारतात पादचारी पातळीवरील तापमानात ५.६ अंशांची घट; ‘योग्य झाड, योग्य जागा’चा जागतिक अभ्यासातून ठोस पुरावा

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

SCROLL FOR NEXT