उत्तर महाराष्ट्र

तब्बल...दहा वर्षानंतर भावाची बहिणीशी झाली भेट 

अंबादास बेनुसकर

देशशिरवाडे : साक्री तालुक्यातील निजामपुर येथील महिला रंजनाबाई दत्तात्रय चिंचोले या तब्बल 10 वर्षांपासून घराबाहेर भटकंती करत होत्या.10 एप्रिल रोजी रंजना चिंचोले यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर फिरत होता. तो व्हिडीओ येथील प्रतीक कोतकर यांनी अक्षय कोठावदे यांना पाठवला अक्षय कोठावदे यांनी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक वाणी व निजामपुर येथील राजेंद्र राणे यांना पाठवला संबंधित व्हिडिओची शहानिशा केली असता तो  भुसावळ येथील असल्याचे समजले.

10 एप्रिल रोजी सायंकाळी रंजना चिंचोले यांच्या भावाने भुसावळ येथील रेल्वे पोलिस स्टेशन आणि बाजारपेठ पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.या घटनेच्या पार्श्वभूमिवर भुसावळ येथील स्थानिक पत्रकारांनी त्या महिलेची विचारपुस केली व पोलिस यंत्रनेला माहिती दिली.12 एप्रिलला रंजना चिंचोले या भुसावळ येथील बाजारपेठ पोलिसांना रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळुन आल्या,त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी रंजना चिंचोले यांच्या भावाला ही माहिती दिली व आपली बहिन येथे सुखरूप असल्याचे सांगितले.व येथे येऊन त्यांना घरी घेऊन जाण्याची विनंती केली.अवघ्या दोन दिवसांच्या पाठपुराव्या नंतर रंजना चिंचोले व  बंधु राम चिंचोले यांची तब्बल दहा वर्षानंतर अविस्मरणीय भेट सोशल मीडियामुळे झाली.

केंद्रात राहत होत्या
रजनी दत्तात्रय चिंचोले यांचे लग्न होत नव्हते म्हणून तिला पिंपळनेर जवळील मानव  केंद्रात सुपुर्द केले होते.तेथे एका स्वयंपाक करणाऱ्या ईसमाबरोबर तिचे लग्न करण्यात आले. तिला दोन मुली झाल्या.दुर्दैवाने तिचे पती सुद्धा स्वर्गवासी झालेले आहेत.आणी आज रजूताईचा सांभाळ कोणी करावा म्हणून मोठा प्रश्न उभा राहिला होता. अनेकांनी तिच्या भावांशी संपर्क साधला व ती कुठेच राहत नसून मुलींकडे सूध्दा राहत नाही.त्यामुळे अनेकांनी वृद्धाश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला होता.10 एप्रिल 2020 निजामपुर येथील एका महिलेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता,तो व्हीडिओ भुसावळ येथील होता.अक्षय कोठावदे यांनी सर्वप्रथम याची माहिती काही समाजबांधव व  पत्रकारांमार्फत त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवली, त्यांच्या नातेवाइकांनी भुसावळ येथील पोलीस स्टेशन येथे संपर्क केला असता ती महिला रेल्वे स्टेशनच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार त्या महिलेचे नातेवाईक तिला पोलीस यंत्रणेच्या मदतीने घेण्यासाठी सोमवारी भुसावळ येथे गेले असून तिला घरी आणल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: सायकल ट्रॅक, जिम, 60 हजार झाडं... मुंबईला ‘सेंट्रल पार्क’ची भेट मिळणार! लंडन-न्यूयॉर्कला टक्कर देणार; काय सुविधा असणार?

Tilak Varma: श्रीलंका, तेलंगणा अन् थेट मुंबई! मित्राच्या शपथविधीसाठी तिलक वर्माची खास उपस्थिती,'मी त्याला लहानपणापासून...

आयुष्यातले तीन टर्निंग पॉइंट! चाहत्यांच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं उत्तर , म्हणाली...'काही लोकांना माफ तर...'

Latest Marathi News Live Update : पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

SCROLL FOR NEXT