Rain 
उत्तर महाराष्ट्र

मघा नक्षत्रात गाढवाने भार उचलला

तीन-चारला ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाचच्या दरम्यान पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले.

सकाळ डिजिटल टीम


तऱ्हाडी : यंदा शिरपूर तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने (Rain) सुरवातीला टप्प्याटप्प्याने काही भागांत हजेरी लावल्याने खरीप पिकांची पेरणीही (Sowing of kharif crops) त्याचप्रमाणे झाली होती. दरम्यान, पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने या काळात कडक उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र बुधवारी (ता.१८) मघा नक्षत्रात (Magha Nakshatra) पहिल्याच दिवशी तऱ्हाडी, ममाणे, अभानपूर, जवखेडा, भटाणे, जळोद, भामपूर परिसरात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.


अनेक दिवसांपासून बळीराजा हवालदिल होऊन आभाळाकडे डोळे लावून बसला होता. शिरपूर पश्चिम भागात तऱ्हाडी परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, या पावसामुळे खरिपाची पिके तरली असून, शेतकरी अजूनही मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. तब्बल वीस दिवसांपासून गायब असलेल्या पावसामुळे पिकांनी माना टाकण्यास सुरवात केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केलेला खर्च वाया जातो की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु मंगळवारी तीन-चारला ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाचच्या दरम्यान पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले.

बळीराजाला आधार
शिरपूर तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दिवसा कडक उन्हाचे चटके, तर रात्री गार वारे यामुळे शेतकरीराजा चिंतेत होता. परंतु, मंगळवारी तीन-चारला तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाला सुरवात झाल्याने बळीराजाला आधार मिळाला. मात्र उर्वरित तालुक्यात अजूनही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी १६ ते २४ ऑगस्टदरम्यान धुळे जिल्ह्यात चांगल्या पावसाचे संकेत दिले होते. ते आज खरे ठरत असून, शेतकरी सुखावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Dahihandi: ९व्या थरावरून गोविंदा कोसळला, मनसेच्या गणेश चुक्कल दहीहंडीत थरारक प्रकार

नॅशनल हायवेवर थांबलेल्या ट्रकला कार धडकून८ इंजिनिअर विद्यार्थ्यांचा मृत्यू; घटनेचा CCTV VIDEO VIRAL

Solapur Ganesh Mandal Electricity : मंडळांना अर्जानंतर २४ तासांत वीज महावितरणकडून ऑनलाइन अर्जाची सुविधा; मिरवणूक मार्गावरही कर्मचारी तैनात

Marathi News Live Updates: अलंकार महिला पीजी कॉलेजमध्ये NEET PG 2026ची पुनर्परीक्षा सुरू, परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा

Nandurbar MBBS Student : नंदुरबारात 'एमबीबीएस'च्या २१ वर्षीय विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT