BEd admission 
उत्तर महाराष्ट्र

बीएड्‌ प्रवेशासाठी सीईटी सेलने वाढविली मुदत 

प्रा. डॉ. दीपक बाविस्कर

धुळे : राज्यात बीएड प्रवेशासाठी सीईटी सेलने प्रवेशाची मुदत वाढविल्याचे पत्रक नुकतेच प्रकाशित केले. उर्वरीत जागांसाठी विद्यार्थांना पुन्हा तीन दिवस देण्यात आले आहे.
बी.एड्‌. प्रवेश प्रक्रियेकरीता क्षमता असूनही तीन हजाराहून अधिक प्रतिक्षेत या मथळ्याखाली ई सकाळला बातमी प्रसारित केली. गेल्या दोन महिन्यांपासून सूरू असलेली बी.एडची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया चौथ्या प्रवेश फेरीनंतर संपली. मात्र अद्यापही ३ हजार १९२ जागा रिक्त होत्या. त्यासाठी सामाईक प्रवेश प्रक्रिया विभागाने आज (ता.१६) पत्रक प्रकाशित केले. पत्रकात दर्शविल्या प्रमाणे उर्वरीत जागासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

१९ मार्च आता अंतिम मुदत
गुरूवारपासून (१७ मार्च) विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. १८ मार्चला मेरिट लिस्ट प्रसारित होईल. यानंतर १९ मार्चला प्रवेशाची मुदत दिली आहे. ऑप्शन फॉर्म भरण्यासंबंधी विद्यार्थ्यांनाही सीईटी सेलचा मेसेज प्राप्त झाला आहे. 

होवू शकतात तीन हजापेक्षा अधिक प्रवेश
राज्यात बीएड्‌ प्रवेशाची क्षमता ३२ हजार २९० असून २९ हजार ९८ विद्यार्थी प्रवेशीत झाले आहेत. अर्थात तीन हजार १९२ जागा रिक्त आहेत. आता तीन दिवसांची मुदत मिळाल्‍यामुळे उर्वरीत तीन हजार जागा देखील पुर्णपणे भरल्‍या जावू शकतात.

बीएड प्रवेशासाठी 
एकुण विद्यार्थ्यांची नोंदणी . . . . ४६,८१७
पात्र विद्यार्थी . . . . . . . . ३९,९१९
प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस पात्र विद्यार्थी . .३८,२४५
राज्यात महाविद्यालय संख्या . . . . ४९६
विद्यार्थी जागा . . . . . . . . ३२,२९०
प्रवेशित विद्यार्थी . . . . . . . २९,०९८
रिक्त जागा . . . . . . . . ३,१९२

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्रात धक्कादायक घटना; भाजप मंत्र्यांच्या भावाला अन् पुतण्याला मारहाण, Video समोर आल्यानंतर खळबळ

Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Kolhapur Infrastructure: टोपचा उड्डाणपूल अडकला ठेकेदारांच्या वादात; सहापदरी कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष; नव्या निविदेमुळे काम आणखी लांबणार

SCROLL FOR NEXT