residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

फेटा बांधण्याच्या कलेतून साधली कुटुंबाची प्रगती 

सागर आहेर ः सकाळ वृत्तसेवा

चांदोरी, "सर सलामत तो पगडी पचास', असे म्हणतात. यातला गमतीचा भाग सोडला, तर आजच्या जमान्यात किती जणांना फेटे बांधता येतात, हा प्रश्‍नच आहे. मात्र निफाड तालुक्‍यातील भेंडाळी गावातील सुदाम खालकर जवळपास 30 हून अधिक पद्धतीचे फेटे बांधतात. आतापर्यंत खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले, उदयनराजे भोसले, दिवंगत भय्यू महाराज यांना फेटा बांधण्याचे भाग्य लाभले, तर रायगडावर 2009 पासून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या शिवभक्तांना स्वखर्चाने फेटे बांधतात. 

जशी प्रत्येक मैलावर भाषा बदलते, तसा वेशभूषेतही बदल होत असतो. प्रत्येकाची फेटे बांधण्याची पद्धतही वेगळी! कोल्हापुरी फेटा, सोलापुरी फेटा, ब्राह्मणी फेटा, धनगरी फेटा, शेतकरी फेटा, राजस्थानी फेटा यांसह फेटे बांधण्याचे अनेक प्रकार आहेत. अशा तीस प्रकारांत सुदाम खालकर सहज फेटा बांधतात. शिवाय डोळ्याला पट्टी बांधूनही फेटा बांधण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे.

तुकाराम खेडकर यांच्या तमाशातील तत्कालीन व्यवस्थापक तात्या बेल्हेकर यांच्या मुलाच्या लग्नात श्री. खालकर यांच्याकडे घोडा असल्याने ते नवरदेव मिरवण्यासाठी गेले. श्री. बेल्हेकर यांची फेटा बांधणी बघून ते प्रभावित झाले. त्यानंतर जीवनातील पहिली ऑर्डर लासलगाव येथील रॉयल पॅलेसमध्ये 300 रुपयांची केली. मात्र ते पैसेदेखील खूप वाटले. परिस्थिती प्रतिकूल असल्याने कोठुरे, गुळवंच, निफाड येथे पायी जाऊन फेटे बांधले. फेट्यांच्या व्यवसायातून 2006 मध्ये पहिल्यांदा सायकल घेतली. त्यानंतर घर बांधले आणि द्राक्षबागही लावल्याचे खालकर अभिमानाने सांगतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT