karjmukti 
उत्तर महाराष्ट्र

कोरोना’चा असाही फटका : कर्जमुक्ती योजनेपासून 33 हजार शेतकरी वंचीतच

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजना सुरु करून दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्यांना तिचा लाभ देवू केला होता. अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभही मिळाला. मात्र जळगाव जिल्ह्यात अद्यापही 33 हजारांवर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ न मिळाल्याने ते योजने पासून वंचीत आहे. कोरोना’चा संसर्गापासून सर्वत्र लॉकडाऊन आहे. मंत्रालयात व विविध शासकीय कार्यालयात केवळ 5 टक्केच कर्मचारी कामावर आहे. यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती रखडली असल्याचे शेतकरी सांगतात.
कर्जमुक्ती योजने लाभास पात्र शेतकऱ्यांची माहिती जानेवारी महिन्यात युध्द पातळीवर घेवून शासनाच्या कर्जमुक्तीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांचे अकौंट क्रमांक, आधारक्रमांक बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी ठिकठिकाणी प्रमाणीकरणाचे कॅम्प लावले गेले. संबंधित शेतकरी राहत असलेल्या परिसरात त्याचे प्रमाणीकरण होवून त्याने घेतलेले कर्ज, अकौंट क्रमांक, आधारक्रमंांक बराेबर आहे याची खात्री झाल्यानंतरच कर्ज मान्य असल्याबाबत ‘थम’ घेवून तो कर्जमुक्ती झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येत होते. जिल्यात आतापर्यंत जिल्हा बँकेच्या 1 लाख 27 हजार 832 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष या योजनेचा लाभ मिळाला. त्यासाठी शासनाकडून 593 कोटीचा निधी आला होता. त्यापैकी 587 कोटीचा निधी वाटप झाला. बँकेचे 37 हजार 321 लाभाथ्यर्ायांना लाभ देणे बाकी आहे. तर 23 हजार 433 शेतकऱ्यांची अजून नावे येणे बाकी आहे.
राष्ट्रीयकृत बँकेचे सुमारे दहा हजार शेतकरी या योजने पासून वंचीत आहेत. असे एकूण सुमारे 33 हजार शेतकरी या योजनेपासुन वंचीत आहे.
कोरोना’मध्ये फक्त महत्वाच्या कामांना शासकीय पातळीवर प्राधान्य दिले जात आहे. यामुळे कर्जमुक्ती योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. खरिप हंगाम तोंडावर उभा आहे. शेतकऱ्यांना अद्याप खरिपाचे कर्ज वाटपाचे नियोजन जिल्हा प्रशासनाने, कृषी विभागाने, बँकांनी जाहीर केलेले नाही. या योजनेचा लाभ जर मेपूर्वीच मिळाला तर अनेक शेतकऱ्यांना बियाणे, खते घेण्यास मदत हाेवू शकेल असे शेतकऱ्यांना वाटते.

आकडे बोलतात...
* जेडीसीसी बँकेचे अपलोड खाते--1 लाख 51 हजार 265
* विशिष्ठ क्रमांक घेवून प्राप्त यादी--1 लाख 27 हजार 832
* निधी प्राप्त सभासद--1 लाख 13 हजार 944
* निधीची रक्कम-593 कोटी 80 लाख
* निधी वाटप झालेले सभासद--1 लाख 12 हजार 962
* निधीची रक्कम--587 कोटी 73 लाख
* विशिष्ट क्रमांक मिळणेबाकी शेतकरी-23 हजार 433
* रक्कम येवून निधी वाटप बाकी शेतकरी--37 हजार 321
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT