उत्तर महाराष्ट्र

नाथाभाऊंवरील पक्षाच्या विश्‍वासाला बळकटी 

कैलास शिंदे

जळगाव : भाजपच्या पहिल्याच यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या नेतृत्वाची असलेली "खप्पा मर्जी' दूर झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तर दुसरीकडे, त्यांच्यावर पक्षनेतृत्वाच्या विश्‍वासाला बळकटी मिळाली आहे. यामुळे केवळ रावेरच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील आठही मतदार संघात पक्षाला फायदा होण्याची शक्‍यता आहे. 
एकनाथराव खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणात कथित गैरव्यवहाराच्या आरोपामुळे मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर झालेल्या चौकशीला ते सामोरेही गेले. त्यातून त्यांना "क्‍लीन चीट'ही मिळाली. त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षातर्फे त्यांना अद्यापही "क्‍लीन चीट' जाहीर करण्यात आले नाही. तसेच मंत्रिमंडळात घेण्याबाबत संकेतही देण्यात आले नाही, त्यामुळे खडसे पक्षावर नाराज होते. याबद्दल त्यांनी जाहीरपणे पक्षाच्या नेतृत्वाबाबत खदखदही व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या स्नूषा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत राज्यभर उत्सुकता होता. शिवाय जर रक्षा खडसे यांना उमेदवार मिळाली नाही तर एकनाथराव खडसे पक्ष सोडून कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशीही चर्चा सुरू झाली होती. याशिवाय रावेरचे विद्यमान आमदार व माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. 
आज पहिल्या यादीत रक्षा खडसे यांची रावेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावर पक्ष नेतृत्वाच्या विश्‍वासाला बळकटी मिळाली आहे. तर, दुसरीकडे स्वत: खडसे प्रचारात उतरून उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या इतर जागांवरही पक्षाला फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. शिवाय, एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात असलेले वादाची तीव्रताही कमी होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे रावेर लोकसभा मतदार संघासाठी आपण रक्षा खडसे यांच्या नावाची शिफारस केली असल्याचे पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन यांनी जाहीरपणे सांगितले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT