उत्तर महाराष्ट्र

मुक्‍ताईनगर नगरपंचायतीवर भाजपची सत्ता 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः मुक्‍ताईनगर नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुक प्रक्रियेतील मतमोजणी आज झाली. या निवडणुकीत नगरपंचायतीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपने विजय प्राप्त करत सत्ता मिळविली. मतमोजणी प्रक्रियेत 17 जागांचे निकाल जाहीर झाले असून यात 13 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून 1 अपक्ष आणि 3 जागा सेनेच्या आल्या आहेत. 
मुक्‍ताईनगर नगरपंचायत निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. निवडणूक माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची होती. तर शिवसेना- राष्ट्रवादी आघाडी आणि कॉंग्रेससाठी अस्तित्वाची लढाई झाली. सकाळी नऊला मतमोजणी प्रक्रियेला सुरवात झाली. यात सुरवातीपासून भाजपच्या उमेदवारांची घेतलेली आघाडी कायम राहिली. नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी 13 जागांवर भाजपचे वर्चस्व राखत तिरंगी लढतीत एकहाती सत्ता मिळविली. तर नगराध्यक्ष पदाकरीता भाजपचे उमेदवार नजमा तडवी हे विजयी ठरले आहे. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Bans Cricketer: ICC ची मोठी कारवाई! अमेरिकेच्या ‘या’ क्रिकेटपटूवर तब्बल ८ वर्षांची बंदी; नेमकं काय केलं?

Crime News : पुणे ग्रामीणच्या धडक कारवायांनी उरुळी कांचन हादरले; अवैध धंद्यांवर कारवाईनंतर चर्चांना उधाण

UP cyber fraud: युट्यूबवरून शिकले सायबर ठगीचे धडे; आयफोनने UPI हायजॅक करून नेपाळच्या कॅसिनोमध्ये उडवले लाखो रुपये

Latest Marathi News Live Update : अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या युवकाला जीवदान

'बेस्ट फिल्डर मेडल'ची सुरुवात करणाऱ्या सदस्याने दिला टीम इंडियाला भावूक निरोप, "मी माझे सर्वस्व दिले..."

SCROLL FOR NEXT