उत्तर महाराष्ट्र

गरजूंना व रूग्णांना जेवण देत मुक्ताईनगर येथे हनुमान जयंती साजरी...

सकाळवृत्तसेवा

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील समाज कार्यात सतत पुढे असणार्या वंदे मातरम गृपच्या तरुण सदस्यांनी पुढाकार घेत आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने परप्रांतीय त्याचप्रमाणे शहरातील गरजू लोकांना शहरात फिरुन अन्नदान केले. यावेळी एका वाहनामध्ये जेवणाचे पार्सल बनवून शहरातील प्रत्येक रुग्णालयात जावून रुग्णांसाठी भोजन पुरविण्यात आले. यावेळी सकाळ व संध्याकाळ 300 ते 400 गरजूंची भूक मागविण्यात आली. 

आज हनुमान जयंती असल्याने नुतन मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री. वीरेंद्र भोईटे यांनी या कार्यात मोलाचा वाटा स्वीकारून अन्नदानाची जबाबदारी स्विकारली. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज रुग्णालयांत रुग्णांना खिर, पुरी मोतीचूराचे लाडू, गंगाफळाची भाजी असे पदार्थ असलेले जेवण देण्यात आले. 


यावेळी तहसीलदार श्याम वाडकर व नायब तहसीलदार प्रदिप झांबरे, पो,नि. सुरेश शिंदे, डॉ.योगेश राणे शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, प्रदिप काळे यांनी स्वतः जेवण वाढले. भिला वाणी व त्यांच्या परिवाराने कोणत्याही मोबदला न घेता गरजु करिता रुचकर आणि स्वादिष्ट जेवण हे तयार करून दिले. या सामाजिक कार्यात मुक्ताईनगर येथील वंदे मातरम गृपच्या सदस्यांचे मोठे योगदान होते. वंदे मातरम गृपचे धनंजय सापधरे, संजय कपले, भिला वाणी, शुभम तळेले, राहुल शुरपाटणे, अमरदिप पाटील, सुमित बोदडे, विश्वनाथ घुले, भिकन शेख, शंकर बोराखेडे, दिपक खेवलकर, सुनिल सुरपाटने, विशाल देशमुख, कलिम पिंजारी आशिष भंसाली, स्वप्निल श्रीखंडे, जाकिर भाई यांनी संपुर्ण शहरात फिरुन अन्नदान केले. 

यावेळी उपजिल्हा रुग्णालय, पाचपांडे हॉस्पिटल , गायत्री हॉस्पिटल , श्रीराम  नर्सिंग होम, कुसुमश्री नर्सिंग होम,  मुक्ताई हॉस्पिटल , शोभा हॉस्पिटल,  आरोग्यम हॉस्पिटल , संजीवनी हॉस्पिटल , वात्सल्य बाल रुग्णालय या हॉस्पिटल  मध्ये रुग्णांना जेवण पुरविण्यात आले.यावेळी अन्नदाते विरेंद्र भोईटे व समाज सेवकांचे यावेळी रुग्णांनी आभार मानले. तसेच वंदे मातरम गृपच्या या रोजच्या समाजसेवेचे शहरातील सर्वच थरातुन सध्या कौतुक होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT