mahavitaran mahavitaran
उत्तर महाराष्ट्र

वीज वितरण कंपनीला भरपाईचा शॉक; मीटर फॉल्टी दाखविणे भोवले

वीज वितरण कंपनीला भरपाईचा शॉक; मीटर फॉल्टी दाखविणे भोवले

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : वीज मीटर फॉल्टी दाखवून ग्राहकाला बेकायदेशीरपणे चुकीचे वीजबिल दिल्या प्रकरणी नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने वीज वितरण कंपनीला चांगलाच शॉक दिला आहे. वीज ग्राहकाला देण्यात आलेले वादग्रस्त बिले रद्द करून ४५ दिवसाच्या आत नवीन मीटर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच मानसिक व शारीरिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि खर्च पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक निवारण आयोगाने दिला आहे. (navapur-mahavitaran-power-distribution-company-fined-by-consumer-forum)

नवापूर तालुक्यातील नवागाव येथील दिलीप आत्माराम पवार यांनी घरासाठी १९७८ पासून वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन घेतले आहे. तेव्हापासून ते वेळोवेळी वीज बिलांचा भरणा नियमित करीत आले आहेत. दरम्यान सन २०१७ मध्ये वीज वितरण कंपनीने त्यांचे वीज मीटर फॉल्टी दाखवून सुमारे १ लाख ६४ हजार ५६० रुपयांचे चुकीचे विजबिल पाठवले होते. याबाबत दिलीप पवार यांनी नवापूर येथील ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करून न्यायाची अपेक्षा केली होती.

मीटर केले जप्‍त

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. शिवाय कोणतीही पूर्वसूचना न देता घराचे वीज बंद करून मीटर जप्त केले होते. याबाबत तक्रारदार पवार यांनी ॲड. धनराज गवळी यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक निवारण आयोगाकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला.

महावितरणला झटका

ॲड. गवळी यांनी प्रत्यक्ष वापर झालेले युनिट आणि वीज कंपनीने पाठवलेले चुकीचे वीज बिल यासंबंधीचे बारकाईचे मुद्दे ग्राहक आयोगाच्या लक्षात आणून दिले. तसेच तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडित असल्याने दैनंदिन आवश्यक गरजांपासून वंचित राहावे लागले आहे. शारीरिक मानसिक व आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढत ग्राहक आयोगाने आपला निकाल दिला आहे. वीज कंपनीने दिलेले वादग्रस्त देयके रद्द करून ४५ दिवसाच्या आत तक्रारदार यांच्या घरी विनामोबदला नवीन वीज मीटर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि खर्चापोटी पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे ग्राहकांशी मनमानी करून अवाजवी विजबिल आकारणाऱ्या वीज कंपनीला चांगला झटका बसला आहे. या खटल्याचे कामकाज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष संजय बोरवल, सदस्य बी. पी. केतकर, एम. एस. बोडस यांच्या न्यायालयात चालले. तक्रारदारातर्फे एडवोकेट धनराज गवळी यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT