marriage 
उत्तर महाराष्ट्र

जैताणेत वधू-वर बोहल्यावर; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकरा हजाराची मदत

प्रा. भगवान जगदाळे

निजामपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जैताणे (ता. साक्री) येथे आज मोजक्‍या नातेवाईकांच्या उपस्थितीत व "फिजिकल डिस्टन्स' राखत एक विवाह सोहळा झाला. या विवाहाचे वैशिष्ट म्हणजे वधू-वराच्या परिवाराने कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अकरा हजार रुपये दिले. नवदाम्पत्याच्याहस्ते मदतीचा धनादेश मंडळाधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आला.

जैताणे येथील ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक तथा सामाजिक कार्यकर्ते यादव तुळशीराम भदाणे यांचा एकुलता मुलगा भूषण व येथीलच राजू टेलर उर्फ राजेंद्र रामभाऊ सूर्यवंशी यांची मुलगी किर्तना यांचा आज दुपारी घरीच विवाह झाला. वधूवरांनी मास्क, हातमोजे परिधान केले होते. तर उपस्थितांना सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. निजामपूरचे मंडळाधिकारी विजय बावा यांच्यासह साक्रीचे मंडळाधिकारी अनिल बाविस्कर, तलाठी भूषण रोजेकर, सरपंच ईश्वर न्याहळदे, माजी सरपंच तथा गटनेते संजय खैरनार, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, लिपिक यादव भदाणे, माजी उपसरपंच नवल खैरनार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, उपाध्यक्ष गोकुळ पाटील, तालुकाध्यक्ष सतीश बाविस्कर, एकनाथ सोनवणे, शांतीलाल भदाणे, भिका न्याहळदे, राजू सूर्यवंशी, छोटू भदाणे, मंगलबाई भदाणे, मिनाबाई सूर्यवंशी, गणेश अहिरे, भगवान रोकडे, पुरोहित अरुण धारणे आदींसह भदाणे व सूर्यवंशी कुटुंबीय उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या विवाह सोहळ्यात फिजिकल डिस्टन्स राखण्याची खास खबरदारी घेतली गेली. भदाणे व सूर्यवंशी परिवाराने सामाजिक बांधिलकी दाखवत कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीसाठी शासनाला अकरा हजार रुपयेही देऊ केले. हा मदतीचा धनादेश मंडळाधिकारी विजय बावा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT