उत्तर महाराष्ट्र

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्त्या ? रस्त्यावर वृक्षारोपण करून निषेध 

जितेंद्र मेखे


शिंदखेडा : येथील भगवा चौक ते माळीवाडा नवीन बुराई पूल पर्यंतचा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यात खड्डे की खड्यात रस्त्या असा प्रश्न येथील रहिवासी करत आहे.संत सावता युवक संघाच्या वतीने या रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण करून निषेध करण्यात आला व रस्ता लवकरात लवकर दुरुत्त करण्याचे निवेदन बांधकाम विभाग अधिकारीना देण्यात आले. दिनांक 25 ऑगस्ट पासून जनांदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. 

येथील पंचायत समिती चौफुली वरील भगवा चौक ते माळीवाडा नवीन बुराई पूल पर्यंतचा रस्ताची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे मागील वर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा शिंदखेडा दौरा असल्याने जि प बांधकाम विभागातर्फे या रस्त्याच्या दुरुस्तीस सुरवात करण्यात आली परंतु दौरा रद्द झाल्याने हे काम आहे त्याच स्थितीत अपूर्ण सोडण्यात आले या रस्त्याची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे झाले आहे पावसाचे पाणी या खड्यात साचून डबके व तळ्यांचा स्वरूप या रस्त्याला आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून पायी चालणे अवघड झाले आहे. 

संत सावंत युवक संघ महाराष्ट राज्य शाखा शिंदखेडा व शहरातील नागरिक यांनी प्रशासनास रस्त्यात खड्डे की खड्यात रस्त्या? असा सवाल उपस्थित केला आहे व येथील राहिवासींनी संताप व्यक्त करत रस्त्यावरील खड्यात वृक्षरोपन केले. 


निवेदनात म्हटले आहे की सदर रस्ता दिनांक 24 ऑगस्ट पूर्वी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती दगडुग्गी करून दुरुस्त केला नाही तर दिनांक 25 ऑगस्ट पासून माळीवाडा, जनता नगर, सावता नगर, रजाक नगर व कॉलनी परिसरातील राहिवस्यानी जनांदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर प्रा दीपक माळी, संजयकुमार महाजन, विनोद जाधव, केशव माळी, महेंद्र माळी ,सतीश माळी, सुखदेव माळी, सागर माळी,विजय जाधव,राजू माळी यासह आदींच्या सह्या आहेत .

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: टीम इंडियाने 'गार्ड ऑफ ऑनर' दिला, पण शेवटच्या ODI मध्येही एलिसा हेली भारताला नडली अन् दीडशतक ठोकलं; पाहा Video

Courtney Walsh: परिस्थितीनुसार खेळात बदल करण्याची क्षमता बाळगा; झिम्बाब्वेचे गोलंदाजी प्रशिक्षक वॉल्श यांचा सल्ला

विवाहितेशी सोशल मीडियावर ओळख, मैत्रीतून प्रेमसंबंध; बोलायची बंद झाल्यानं गोळी झाडून हत्या, स्वत:लाही संपवलं

Latest Marathi News Update : धाराशिव जिल्ह्यातील परांड्यात ड्रग्स तस्करी

Homemade Blush: फक्त हा एक पदार्थ वापरुन तयार करा ब्लश; गाल दिसतील नैसर्गिक गुलाबी अन् फ्रेश

SCROLL FOR NEXT