MLA Rajesh Padvi's Baliraja style is going viral on social media. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar: चक्क आमदारच ट्रॅक्टर चालवतात तेव्हा...! आमदार पाडवींच्या बळीराजा स्टाइलची सोशल मीडियावर धूम

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar : आमदार असूनही कोणताही बडेजाव नाही की मोठेपणा नाही. आपल्या युवा कार्यकर्त्यांमध्ये गेल्यावर त्यांच्याशी समरस होऊन जाणाऱ्या आमदारांच्या या साध्या-सरळ वागणुकीमुळे आमदार राजेश पाडवी यांनी आज मतदारसंघातील लाखो युवकांची मने जिंकली आहेत.

सध्या त्यांच्या शेतकऱ्याचा पेहराव धारण करीत डोक्यावर मुंडासे बांधून, ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, बळीराजाच्या त्यांच्या या आगळ्यावेगळ्या स्टाइलने सोशल मीडियावर चांगलीच हवा केली आहे. (MLA rajesh Padavi Baliraja style popular on social media Nandurbar)

शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या आमदारकीच्या सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीत तळागाळातील, जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी सातपुड्याच्या कान्याकोपऱ्यात पायपीट केली आहे,

तर दुसरीकडे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विजेचा अथवा पाण्याचा प्रश्न असो की पपईचा तिढा असो तो सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच सकारात्मक तसेच वेळप्रसंगी संघर्षात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे.

शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ, आस्था बघूनच आमदार राजेश पाडवी यांची नुकतीच तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दरम्यान, राजकारणासोबतच कधी हातात बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानावर आमदार राजेश पाडवी यांनी मारलेला चौकार, षटकार असो की मित्रांच्या लग्नातील त्यांचा सुपर डान्स असो वा पुष्पा स्टाइलने गळ्याजवळ हात फिरवत ‘पुष्पाराज.... मैं झुकेगा नहीं साला...’ ही पुष्पा चित्रपटातील नायकाची स्टाइल असो अथवा शालेय विद्यार्थ्यांसोबत एसटी बसने केलेला प्रवास असो त्यांच्या वेळोवेळी हटके स्टाइलने नेहमीच युवा वर्गामध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे.

त्यामुळेच युवकांना आमदार पाडवी आपल्यातीलच एक वाटू लागले आहेत. दरम्यान, आपल्या शेतात आमदार राजेश पाडवी डोक्यावर मुंडासे बांधून शेतकरी वेशात ट्रॅक्टर चालवत शेतीची आनंदाने मशागत करीत असल्याचे व्हिडिओ व फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियामध्ये वायरल होत आहेत.

एव्हाना शर्ट-पॅन्ट, सुटा-बुटातील आमदारांना पाहण्याची सवय झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना शेतकरी वेशात असलेले आमदार राजेश पाडवी चांगलेच भावले आहेत. त्यामुळेच त्यांच्या व्हायरल व्हिडिओला मतदारसंघातील नागरिकांकडून विशेषतः युवकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अनेकांनी तर त्यांचे फोटो व व्हिडिओदेखील स्टेटसला ठेवले आहेत. एकंदरीत आमदार राजेश पाडवी यांची बळीराजा स्टाइलची सोशल मीडियावर चांगलीच धूम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT