MP Dr. Subhash Bhamre esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे-मुंबई एक्स्प्रेस लवकरच धावणार : खासदार डॉ. भामरे

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे ते मुंबई स्वतंत्र रेल्वेची धुळेकरांची मागणी केंद्र सरकारकडून पूर्ण झाली असून लवकरच धुळे-मनमाड-दादर एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वे विभागाने त्यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. (MP Dr bhamre statement Dhule Mumbai Express will run soon news)

धुळे रेल्वेस्टेशनवरुन थेट मुंबई दादर स्टेशनपर्यंत धावणारी रेल्वे सुरू करण्यास रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. आठवड्यातून तीन दिवस प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतल्यानंतर ही रेल्वे दररोज धावणार आहे.

लॉकडाउन काळात मुंबई बोगी बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान खासदार डॉ. भामरे यांनी स्वतंत्र रेल्वेची मागणी लावून धरल्याने व तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून तयार करून घेण्यात आला.

त्यामुळे धुळे-दादर अशी रेल्वे सुरू होण्यास रेल्वे बोर्डाचा हिरवा कंदील मिळाला. धुळे ते मनमाड या लोहमार्गावर अनेक तांत्रिक अडचणी असल्याने हा प्रश्न खितपत पडला होता. मुंबईला जाण्यासाठी धुळेकरांसाठीची एक बोगीही बंद झाली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

एका बोगीतून अधिकाधिक प्रवाशांना ये-जा करणे शक्य नव्हते. यामुळे स्वतंत्र रेल्वेचा विचार पुढे आला तशी मागणी लावून धरली. अखेर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे. धुळे-मनमाड-इगतपुरी-दादर ही रेल्वे सुरू करण्याबाबतची अधिसूचना रेल्वे विभागाने जारी केली आहे.

आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावेल. धुळे स्थानकावरून सकाळी साडेसहाला रेल्वे सुटेल, दुपारी सव्वापर्यंत दादरला पोहचेल. तसेच दादर येथून सायंकाळी सव्वाचारला सुटेल व रात्री साडेअकराला धुळे स्थानकावर पोचेल अशी प्राथमिक स्वरूपाची माहिती रेल्वे विभागाकडून प्राप्त झाल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान,

ही मागणी मंजूर केल्याबद्दल खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT