Nandurbar Accident  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Accident News : पिक-अप नदीत पडून 2 ठार, तर 3 गंभीर

Nandurbar Accident : अक्कलकुवा तालुक्यातील गमनचा उमरपाडा येथील देवनदीच्या खाडीत पिक-अप गाडी पडून दोन जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Accident News : अक्कलकुवा तालुक्यातील गमनचा उमरपाडा येथील देवनदीच्या खाडीत पिक-अप गाडी पडून दोन जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एकजण चोपडा तालुक्यातील, तर एक नाशिक येथील रहिवासी आहे. याबाबत चालकाविरुद्ध मोलगी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (Nandurbar Accident Pickup falls into river 2 killed 3 seriously)

नाशिक येथील कैलास सुरेश पाटील पिक-अप गाडी (एमएच १८, एए ४७३३)वर मजूर घेऊन अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथे जात होता. या वेळी गाडीत मजूरही सोबत होते. पिंपळखुटा ते गमनचा उमरपाडा रस्त्यावर चालक कैलास पाटील याने गाडी भरधाव चालविल्याने त्याचे नियंत्रण सुटले.

देवनदीच्या खाडीत गाडी पडून राजू ओंकार बारेला (वय ३०, रा. कर्जाना, ता. चोपडा, जि. जळगाव) व पोपट दत्तू सोनवणे (४०, रा. नाशिक) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील चालक कैलास पाटील (रा. नाशिक) याच्यासह ज्ञानेश्‍वर उत्तम वाघ (रा. कुंजर, ता. चाळीसगाव), सुनील बड्या पावरा (रा. खर्डी खुर्देचा पाटीलपाडा, ता. धडगाव) हे तिघे गंभीर जखमी झाले.

ही घटना नागरिकांनी मोलगी पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. जखमींना तत्काळ उपचारासाठी अक्कलकुवा येथे पाठविले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत ज्ञानेश्‍वर उत्तम वाघ यांनी मोलगी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार चालक कैलास पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT