Nandurbar Lok Sabha Election esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : एकीकडे बैठका, दुसरीकडे भेटीगाठी!

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी चौथ्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे बाकी आहे.

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने सध्या तरी बूथ लेव्हल कमिटी व सुपर वॉरियर्सच्या बैठकांवर भर दिला असून, काँग्रेसनेही बैठकांसह इंडिया आघाडीतील घटक पक्षांसह मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपापल्या रणनीतीनुसार वाटचाल सुरू केली असून, प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)

त्याआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, जिल्ह्यात प्रचारात कधी रंगत येते, याचीच मतदारांना उत्सुकता आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी चौथ्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे बाकी आहे. त्यानंतरच नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत.

तेव्हा खऱ्या अर्थाने निवडणुकीचा ज्वर चढेल. सध्या तरी राजकीय गोटात शांतता दिसत असली तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांच्या भात्यातील सर्व बाण बाहेर निघणार आहेत. भाजपने सुरुवातीला आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकांवर जोर दिला आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा व प्रत्येक बूथवरील मतदारापर्यंत पोहोचता यावे म्हणून महत्वाचा असणाऱ्या बूथ लेव्हल कमिट्यांच्या बैठका घेण्यावर पक्षाने जोर दिला आहे. (latest marathi news)

त्यासोबतच मतदारसंघातील सुपर वॉरियर्स म्हणून निवड झालेल्या कार्यकर्त्यांच्याही बैठका घेतल्या जात आहेत. प्रदेश पातळीवरील पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी बैठकांना हजेरी लावत आहेत. त्यात तळोदा शहरातही रविवारी बैठका पार पडल्या. बैठकीसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. हिना गावित देखील उपस्थित होत्या.

दुसरीकडे काँग्रेसने इंडिया आघाडीतील घटकपक्षांसह तळोदा तालुका व जिल्ह्यात दररोज इतर ठिकाणी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यासाठी कॉंग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांनी नुकतीच तळोदा शहर, मोड बोरद परिसरातील मतदारांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यात कॉंग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेतले जात आहे.

त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यत दोन्ही पक्षांनी आपापली रणनीती आखली असून, एकीकडे बैठका तर दुसरीकडे भेटीगाठी अशी काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, प्रचाराला वेग निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT