Nandurbar Lok Sabha 2024 Esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha 2024: जुन्या पटावर ‘जुनीच’ प्यादी! गावितांना उमेदवारी देऊन भाजपची सुरक्षित खेळी तर काँग्रेसने पाडवींच्या मुलाला दिली संधी

Nandurbar Lok Sabha 2024: भारतीय जनता पक्षाने नंदुरबार लोकसभेसाठी डॉ. हीना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Lok Sabha 2024: भारतीय जनता पक्षाने नंदुरबार लोकसभेसाठी डॉ. हीना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीतील उमेदवार माजी मंत्री काँग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. मात्र, गोवाल पाडवी यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी काँग्रेस सोडून भाजपत डेरेदाखल झाले. हा काँग्रेसला धक्का आहे.

अशातच खासदार हिना गावित यांच्याकडे दहा वर्षाच्या राजकारणाच्या अनुभव आहे. तर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. मात्र गोवाल पाडवी यांचे वडील के. सी. पाडवी गेल्या ३० वर्षापासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे हिना गावित यांना गोवाल पाडवी कशा पद्धतीने आव्हान देणार हे पाहणं आता महत्त्वाच्या ठरणार आहे.

२०१९ चे चित्र

हीना गावित (भाजप) विजयी मते : ६३९१३६

के. सी. पाडवी (काँग्रेस) मते : ५४३५०७

सुशील अंतुर्लीकर (वंचित बहुजन आघाडी) मते : २५७०२

सुहास नटावदकर (अपक्ष) मते : १३८२०

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : ९५६२९

वर्चस्व

२००४ : काँग्रेस

२००९ : काँग्रेस

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

सीमा वळवी यांच्यासाठी पद्माकर वळवींची फिल्डिंग

हीना गावितांना उमेदवारी देऊन भाजपची सुरक्षित खेळी

भाजपमधील एका गटाचा गावित यांना विरोध

राहुल यांच्या यात्रेचा के. सी. पाडवी यांना फायदा शक्य

हे मुद्दे प्रभावी ठरणार

धनगरांना आदिवासीतून आरक्षण

जिल्ह्यातील रोजगार, स्थलांतर

औद्योगिक वसाहतीचा प्रश्न

मर्जीतील ठेकेदारांना दिली जाणारी कामे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT