10 lakh rupees burglary in Dhruvnagar Indiranagar Gorewadi Nashik News esakal
नाशिक

Crime Alert | शहरात घरफोड्यांची 'हॅटट्रीक'

विनोद बेदरकर

नाशिक : शहरात दोन दिवसांत चोरट्यांनी घरफोड्यांत (burglary) आठ लाखांहून अधिकचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. उन्हाळ्यानिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांना लक्ष्य करीत चोरट्यांनी घरफोड्या सुरू केल्या आहेत.

ध्रुवनगर परिसरात पावणेसहा लाखांची घरफोडी

गंगापूर रोडवर ध्रुवनगर परिसरात डॉन ब्रेकर स्कूलजवळ चोरट्यांनी सुमारे पावणे सहा लाखांची घरफोडी केली. अशोक साहेबराव पाटील (वय ६२, आशीर्वाद दत्तकुंज, डॉन ब्रेकर स्कूलजवळ ध्रुवनगर, गंगापूर रोड) यांच्या तक्रारीवरलन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. १५) रात्री आठला त्यांच्या आशीर्वाद दत्तकुंज इमारतीतील पहिला मजल्यावरील रूम क्रमांक चारचा दरवाजाचा कडीकोयडा तोंडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप, गोल्डन रंगाची वॅगनर (एमएच १५, ईबी ८९०५) चाराचाकीची चावी, ४० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २० ग्रॅमची सोन्याची चेन, १० ग्रॅमचे सोन्याचे कर्णफूल, चार ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी, चार ग्रॅमची सोन्याची लहान मुलाची अंगठी, कानातील २ ग्रॅमच्या रिंगा, दहा हजारांची रोकड असा सुमारे पाच लाख ७२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

इंदिरानगरला पावणेदोन लाखांची घरफोडी

इंदिरानगरला गजानन महाराज मंदिरासमोरील आशिष पार्क भागात चोरट्यांनी घरफोडीत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत मनीष पद्माकर जोशी (वय ३२) यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. १५) ते शनिवारी (ता. १६) रात्री आठदरम्यान चोरट्यांनी आशिष पार्क इमारतीतील प्लॅट क्रमांक चारच्या लोखंडी दरवाजाचे मुख्य कुलूप तोडून घरीतील दोन्ही बेडरूममधील कपाटातील लॉकर तोडून त्यातील ७५ हजारांची रोकड, अडीच तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन, चार ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, चांदीचे ग्लास, पणती, छल्ला, मेखला, मेखला समई, गडू, पैंजण असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

गोरेवाडी शाळेत घरफोडी

गोरेवाडीत महापालिकेच्या (nmc) शाळेतून चोरट्यांनी लहान मुलांच्या शालेय आहार शिजविण्याच्या भांड्यासह मुख्याध्यापकांच्या खोलीतील साहित्य चोरून नेले. शनिवारी (ता. १६) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. गोरेवाडी महापालिका शाळा क्रमांक ५० मध्ये चोरट्यांनी दोन दिवसांच्या शाळेच्या सुट्ट्यांदरम्यान मुख्याध्यापकांच्या कार्यालयाच्या बंद दरवाजाचे कडी कुलूप कार्यालयात प्रवेश केला व साउंड सिस्टीम, पितळी घंटा, स्वयंपाकाची भांडी, तीन लोखंडी बादल्या. सीपीयूसह संगणक, विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी असलेले १५ दप्तर, हामोर्नियम पेटी आदी ऐवज चोरुन नेला. याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT