Jailed esakal
नाशिक

Nashik Crime: आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांना 2 दिवस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहा (ता. सिन्नर) येथील वैष्णवी जाधव या दहावीत शिकणाऱ्या मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांना सिन्नर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

तर याच गुन्ह्यातील विधी संसर्गित अल्पवयीन संशयिताला न्यायालयीन निर्देशानुसार त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्यावर बाल न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. (2 days custody for two who incited suicide Nashik Crime)

वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर व आणखी एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा उल्लेख वैष्णवीने सुसाईड नोट मध्ये केला होता. या तिघांकडून आपल्याला व कुटुंबियांना त्रास होत असल्याचे तसेच त्यांच्याकडून शाळेतील अन्य मुलींना देखील छेडछाड करून नेहमीच त्रास देण्यात येत असल्याचे वैष्णवीने नमूद केले होते.

तिच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार वावी पोलीस ठाण्यात वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव गोराणे, अंकुश धुळसुंदर या दोघांना सिन्नर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

तर तिसरा संशयित अल्पवयीन असल्याने त्याचे विरुद्ध बाल न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. तोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाने त्याचा ताबा त्याच्या पालकांकडे देण्यात आला. न्यायालय सांगेल त्या त्या वेळी त्यास न्यायालयासमोर हजर करणे त्याच्या पालकांना बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांनी छेडछाडीचे प्रकार होत असल्यास त्याची माहिती आपल्या शाळेत मुख्याध्यापकांना, घरी पालकांना द्यावी. आपत्कालीन परिस्थिती पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी केले आहे.

शाळा महाविद्यालयांच्या परिसरात टवाळकी करणाऱ्यांचा योग्य पद्धतीने बंदोबस्त केला जाईल. गावातील नागरिकांनी देखील आपल्या आजूबाजूला विद्यार्थी विद्यार्थिनी असुरक्षित असणार नाही याची काळजी घ्यावी. असेही श्री लोखंडे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT