Showcase smashed to steal gold and silver jewelery from suspect.  
नाशिक

Nashik Crime News: सोमवार पेठेतील सोन्याचे दुकान फोडून 2 लाखाचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सोमवार पेठ येथील धनलक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी गेल्याची घटना शनिवार (ता. ११) उघडकीस आली.

भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (2 lakh theft in gold shop in Somwar Peth nashik news)

तक्रारदार देवेंद्र दंडगव्हाळ यांचे सोमवार पेठ येथे सराफी दुकान आहे. बुधवार (ता. ८) नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले.

काही कारणास्तव गुरुवार (ता. ९) दुकान उघडले नाही. शुक्रवारी (ता. १०) दुकानाच्या मागील बाजूचा दाराचा कडीकोयंडा तुटला असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.

दुकानात प्रवेश करून पाहणी केली असता, चांदीची भांडी, हळदी-कुंकूचे करंडे, पाने, तोरड्या अशा विविध प्रकारच्या अडीच किलो चांदीच्या वस्तू, दागिने आणि सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोराने लंपास केला.

गजबजलेल्या परिसरात अशाप्रकारे चोरी झाल्याने परिसरातील आश्चर्य व्यक्त करण्यात आले. श्री. दंडगव्हाळ यांनी घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

SCROLL FOR NEXT