Nashik Fire Accident esakal
नाशिक

Nashik Fire Accident: इंदिरानगरला पार्सल पॉईंट मध्ये गॅसचा भडका उडाल्याने 2 गंभीर जखमी

भडका इतका शक्तिशाली होता की त्यांच्यासह दुकानातील भली मोठी शेगडी आणि सर्व भांडे बाहेर फेकले गेले.

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : इंदिरानगर येथील कलानगर चौकातल्या वक्रतुंड पार्सल पॉईंट मध्ये रात्रभर साठलेल्या गॅसचा भडका उडाल्याने दुकानाचे मालक सुरेश लहामगे आणि रिक्षाचालक संदीप पालेकर हे गंभीर जखमी झाले असून दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचार अर्थ दाखल केले आहे. (2 seriously injured in gas explosion at Indiranagar parcel point Nashik Fire Accident)

सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या ठिकाणी वापरात असलेले व्यावसायिक सिलेंडर आहे त्या स्थितीत आहे. पार्सल पॉईंट मध्ये असलेल्या भाज्या गरम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शेगडी मधून कदाचित रात्रभर गॅस गळती झाली असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सकाळी श्री लहामगे यांनी दुकान उघडल्यानंतर लाईट चालू करण्यासाठी बटन दाबले आणि गॅसचा भडका उडाल्याचे आसपास च्या दुकांदारांचे म्हणणे आहे. भडका इतका शक्तिशाली होता की त्यांच्यासह दुकानातील भली मोठी शेगडी आणि सर्व भांडे बाहेर फेकले गेले.

गंभीर अवस्थेत त्यांना माजी नगरसेवक ॲड श्याम बडोदे, अँड अजिंक्य साने ,सामाजिक कार्यकर्ते आकाश खोडे यांच्या मदतीने राहुल देशमुख या युवकाने रुग्णालयात पोचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT