corona virus update esakal
नाशिक

नाशिक जिल्‍ह्‍यात सलग चौथ्या दिवशी दोनशेहून अधिक पॉझिटिव्‍ह

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोना बाधितांच्‍या (Corona positive) संख्येत वाढ होत आहे. सलग चौथ्या दिवशी जिल्‍ह्‍यात आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या दोनशेहून अधिक राहिली. शनिवारी (ता.२६) दिवसभरात २१० रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर २२९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. चार बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. तर दिवसभरात एकूण ५५ मृतांची नोंद पोर्टलवर झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात दोन हजार ४९० बाधितांवर उपचार सुरु आहेत. (210-positive-in-nashik-district-corona-news)

शहरात दिवसभरात एकही कोरोना बळी नाही

शनिवारी नाशिक महापालिका क्षेत्रात १११ पॉझिटिव्‍ह आढळले. तर नाशिक ग्रामीणमध्ये ९८, जिल्‍हा बाहेरील एका रुग्‍णाला कोरोनाची लागण झाली आहे. मालेगावला नव्‍याने एकही रुग्‍णाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला नाही. दुसरीकडे जिल्‍ह्‍यात २२९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दिवसभरातील चार मृतांच्‍या नोंदी असून, हे चौघे नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. अनेक दिवसांनंतर नाशिकला दिवसभरात कोरोनाचा एकही बळी गेला नसल्‍याची नोंद आहे. दुसरीकडे पोर्टलवर मृतांच्‍या नोंदी अद्याप सुरुच आहेत. दिवसभरात झालेल्‍या ५५ नोंदींपैकी ३३ नाशिक महापालिका क्षेत्रातील असून, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक, नाशिक ग्रामीणमधील २१ मृतांच्‍या नोंदी संकेतस्‍थळावर झाल्‍या आहेत.

जिल्‍ह्‍यात ३ लाख ८३ हजार १०५ रुग्‍णांची कोरोनावर मात

जिल्‍ह्‍यात आत्तापर्यंत आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या तीन लाख ९३ हजार ८७४ वर पोहचली आहे. यापैकी तीन लाख ८३ हजार १०५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्‍ह्‍यात दोन हजार ४९० बाधितांचा मृत्‍यू झालेला आहे. शनिवारी सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार १९० रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी मालेगाव क्षेत्रातील ५८९ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. तर नाशिक ग्रामीणमधील ३७३, नाशिक महापालिका क्षेत्रातील २२८ अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४७३ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ४३० रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. तर डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन रुग्‍ण दाखल झाले.

(210-positive-in-nashik-district-corona-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT