cds exam esakal
नाशिक

CDS Exam : कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी 30 ला मुलाखत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी १६ एप्रिल २०२३ ला परीक्षा होईल. या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रशिक्षण होईल. (30 january Interview for Combined Defence Services Exam Preparatory Training nashik news)

त्यासाठी ३० जानेवारीला मुलाखत घेणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी दिली.

श्री. कापले म्हणाले, की जिल्ह्यातील ज्या इच्छुक उमेदवारांनी कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपलब्ध होण्यासाठी ३० जानेवारीला सकाळी अकराला नाशिकमधील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखत घेणार आहे.

मुलाखतीस येताना फेसबुक अथवा Department of Sainik Welfare, Pune (DSW) या संकेतस्थळावर सीडीएस-६० अभ्यासक्रम अथवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेले प्रवेशपत्र व त्यासोबतचे परिशिष्ट पूर्ण भरून ते मुलाखतीवेळी सोबत आणायचे आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी नाशिक रोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात राज्य सरकारतर्फे तरुण-तरुणींसाठी १ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६० होत होत आहे.

प्रशिक्षणार्थी यांच्या निवास, भोजन व प्रशिक्षणाची सोय मोफत आहे. माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ अथवा ८८८८७९८५८४ या भ्रमणदूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT