नाशिक

कुशावर्त तीर्थावर ३१ फुटी धर्मध्वजाची स्थापना

CD
फोटो -NSK26H32618, NSK26H32619 त्र्यंबकेश्‍वर : कुशावर्तावर धर्मध्वजाचे पूजन करताना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, दहा आखाड्यांचे साधु-महंत आदी. दुसऱ्या छायाचित्रात जयघोष करताना साधु-महंत व मंत्री महाजन. कुशावर्तावर ३१ फुटी धर्मध्वजाची स्थापना -------------------------------------- कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजनासह प्रतिष्ठापना सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता. १५ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर ३१ फुटी धर्मध्वजाची धार्मिक व पारंपरिक विधींनुसार पूजा करून तीन वर्षांसाठी स्थापना करण्यात आली. कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सोहळा झाला. स्थानिक पुरोहित संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला दशनाम आखाड्यातील साधु-महंतांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कुशावर्त तीर्थावर आगमन झाल्यानंतर मंत्री महाजन यांनी उपस्थित साधु-महंतांचे शाल व पुष्पमाला देऊन स्वागत केले. त्यानंतर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज शेटे व सदस्यांच्या उपस्थितीत धर्मध्वजा आरोहण स्तंभाच्या प्रतिष्ठापना विधीला प्रारंभ झाला. गणेशपूजा, स्वस्तिश्री पुण्याहवाचन आणि सिंहस्थ निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी धर्मध्वजा आरोहण स्तंभाची पूजा मंत्रोच्चारात करण्यात आली. या वेळी नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित होते. कुंभमेळा कालावधीसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या धर्मध्वजाच्या तळाशी समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या रत्नांचे प्रतीकात्मक चित्रण आहे. तसेच दोन्ही बाजूंना श्रीगणेशाच्या मूर्ती, एका बाजूला अमृतकलश व गरुडाची प्रतिमा आणि पुरोहित संघाचे चिन्ह साकारण्यात आले आहे. धार्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या धर्मध्वजाची तीन वर्षांसाठी स्थापना करण्यात आली. या सोहळ्याला आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपाध्यक्ष शिरसाट, नगरसेवक, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सोनुने व विश्वस्त, प्रांताधिकारी पवन दत्ता, तहसीलदार जाधव, मुख्याधिकारी जाधव, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT