crime esakal
नाशिक

Nashik Crime News : कंपनी व्यवस्थापकाकडून 33 लाखांचा अपहार; ऑडिटमध्ये उघड

कंपनीत एरिया सेल्स मॅनेजर असलेल्या संशयिताने कंपनीच्या मालाची विक्री केल्यानंतर आलेले सुमारे ३३ लाखांची रक्कम कंपनीमध्ये न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : कंपनीत एरिया सेल्स मॅनेजर असलेल्या संशयिताने कंपनीच्या मालाची विक्री केल्यानंतर आलेले सुमारे ३३ लाखांची रक्कम कंपनीमध्ये न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सखोल चौकशीअंती मुंबई नाका पोलिसात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (33 lakh embezzlement from company manager nashik news)

विलास रामभाऊ रायते (रा. मातोश्री रो- हाउस, बालाजीनगर, नाशिक, मूळ रा. पिंपळगाव बसवंत) असे संशयित एरिया सेल्स मॅनेजरचे नाव आहे. विकास साहेबराव वाकचौरे (रा. प्रतीक पार्क, लिंगायत कॉलनी, अशोका मार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, भाभानगर परिसरात खासगी कंपनीचे कार्यालय आहे.

जानेवारी २०२० ते मार्च २०२३ यादरम्यान, संशयित रायते या कंपनीत एरिया सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत असताना, संशयित रायते याने कंपनीचा माल ग्राहकांना विक्री केला. विक्री केलेल्या मालाचे ग्राहकांकडून मिळालेले ३२ लाख ९३ हजार रुपये कंपनीच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर भरणा करणे आवश्यक होते.

परंतु संशयित रायते याने ती रक्कम न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आणि त्या रकमेचा अपहार केला. सदर बाब कंपनीने केलेल्या ऑडिटमधून समोर आली होती. संशयित रायते याने स्वतःचीच दुसरी फर्म सुरू करून मूळचा कंपनीचा माल स्वतःच्या फर्मच्या नावे विकून कंपनीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कंपनीने मुंबई नाका पोलिसांकडे अर्ज केला असता, त्या अर्जाच्या चौकशीअंती गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक हसन सय्यद हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

Latest Marathi News Live Update : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये खुला केला जाईल

Success Story : एका मिस्ड कॉलने बदलले नशीब! भारतीय इंजिनिअरने अमेरिकेत उभी केली 8300 कोटी रुपयांची AI कंपनी, नेमकं कसं केलं पाहा

SCROLL FOR NEXT