General Manager of Bharat Telecom Corporation M. R. Ramesh Pawar welcoming Rawat. esakal
नाशिक

Village Internet Service : शहर- जिल्ह्यातील दुर्गम भागास लवकरच फोर-जी इंटरनेट सेवा : महाप्रबंधक एम. आर. रावत

सकाळ वृत्तसेवा

4G Internet Service : शहर आणि जिल्ह्याच्या दुर्गम भागासाठी लवकर फोर-जी तंत्रज्ञान वापरून इंटरनेट सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी भारत दूरसंचार निगम प्रयत्नशील आहे. फोर-जी तंत्रज्ञान सहजगत्या फायू-जी तंत्रज्ञात बदलणे शक्य होणार आहे, अशी माहिती दूरसंचार निगमचे महाप्रबंधक एम. आर. रावत यांनी दिली.

दूरध्वनी सल्लागार समितीच्या माजी सदस्यांच्या शिष्टमंडळाच्या भेटीवेळी ते बोलत होते. (4g Internet service to remote areas of city district soon General Manager MR Rawat nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बदलत्या काळानुसार दूरध्वनीसाठी कॉपर केबल ऐवजी फायबर केबल सर्वत्र उपयोगात आणण्याचा दूरसंचार निगमचा निर्णय असल्याचे श्री. रावत यांनी स्पष्ट केले. रमेश पवार, उल्हास सातभाई, रमेश वनकर यांनी श्री. रावत यांचे स्वागत केले.

ग्राहकांनी दूरध्वनी कायमचे बंद केले आहेत व संच निगमला परत केले आहेत, अशा ग्राहकांना जमा असलेली अनामत रक्कम बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच कॅनडा कॉर्नर येथील निगमच्या जागेत जिल्ह्यातील दूरध्वनी विकासचा प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतचा इतिहास दर्शविणारे कायमस्वरूपी प्रदर्शन लावण्यात यावी, अशीही मागणी श्री. रावत यांच्याकडे करण्यात आली.

ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी दूरसंचार निगमने ‘ओपन हाऊस मिटींग’ घ्यावी, नवीन तंत्रज्ञानयुक्त मोबाईलसाठी ई-सीम उपलब्ध करून द्यावेत, असेही श्री. रावत यांना शिष्टमंडळाने सांगितले. चर्चेवेळी दूरसंचार निगमचे अधिकारी आर. आर. महाजन हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT