death esakal
नाशिक

तिच तेरावं अन् निकालाचा दिवस एकच; मृत साक्षीला बारावीत 56 टक्के

आयटी इंजिनिअर बनण्याचे साक्षीचे स्वप्न नियतीने हिरावले

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : बारावीनंतर आयटी इंजिनियर (IT Engineer) बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या साक्षीने प्रवेशपूर्व पात्रता परीक्षेची तयारी करण्यासाठी संगमनेर येथे शिकवणी लावली होती. मात्र, नियतीने तिचा दुर्दैवी बळी घेत अभियंता बनण्याचे स्वप्न हिरावून घेतले. 28 मे रोजी नाशिक-पुणे महामार्गावर मैत्रिणींसोबत दुचाकीवरून येणाऱ्या साक्षीला अपघातात आपले प्राण गमवावे लागले. नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालात साक्षीला विज्ञान शाखेत 56 टक्के गुण मिळाले असून तिच्या दुर्दैवी निधनामुळे कुटुंबातील एक भावी अभियंता गमावला आहे.

तिच्या तेरावे अन् निकालाचा दिवस एकच

सिन्नर तालुक्यातील चास येथे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली साक्षी सातवी पासुनच स्कॉलर होती. दहावीच्या परीक्षेत तिला 77% गुण मिळाले होते. तर बारावीला देखील 75 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवण्याची तिची तयारी होती मात्र, परीक्षेच्या अगोदर दोन महिने आजाराने त्रस्त झाल्याने तिला बारावीची अपेक्षित तयारी करता आली नाही. बारावीला 60 टक्के गुण मिळतील ही अपेक्षा धरून तिने उन्हाळी सुट्टीत संगमनेरला इंजीनियरिंग प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा देण्याची तयारी केली होती. त्यासाठी सोबतच्या दोघी मैत्रिणींसोबत ती स्कुटी वरून ये- जा करायची. दोडी येथील ब्रह्मानंद स्वामी ज्युनिअर कॉलेज मधून तिने विज्ञान शाखेतून बारावीचे पेपर दिले होते. नेमका तिच्या तेराव्याचा दिवस आणि परीक्षेच्या निकालाचा दिवस एकच आला. तिच्या गुणपत्रिकेत 56% गुण पाहून शिक्षकांसह तिच्या मित्र-मैत्रिणींना दुःख झाले. घरी तेराव्याचा विधी असल्याने निकाल लागला त्यावेळी तीनशे ते चारशे पाहुणे मंडळी घरी जमलेली होती. त्यांना देखील साक्षीला बारावीच्या परीक्षेत मिळालेले गुण पाहून गहिवरुन आले होते.

चार पिढ्यात पहिल्यांदा कुटुंबात मुलीचा जन्म

बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळतील ही अपेक्षा साक्षीसह तिच्या कुटुंबीयांना होती. त्यामुळे प्रवेशपूर्व पात्रता परीक्षेत ही कसर भरून काढण्याचा शब्द साक्षीने दिला होता. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या साक्षीला शेतीव्यवसायातील कष्ट धोक्यांची जाणीव होती. त्यामुळेच मी इंजिनीअर झाल्यावर आई वडिलांना शेतात कष्ट करण्याची वेळ येऊ देणार नाही असे ती नेहमी सांगायची. तिच्या कुटुंबात चार पिढ्यात पहिल्यांदा साक्षीच्या रुपाने मुलगी जन्माला आल्याने सहाजिकच तिच्यावर सर्वांचा जीव होता. मात्र, मुलगी म्हणून घरात तिला कोणी वागवले नाही असे नातेवाईक सांगतात. तिच्यासोबतची भावंडे देखील उपजत हुशार. काकांचा एक मुलगा अभियंता झालेला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून साक्षी देखील अभियंता बनण्याची स्वप्न रंगवत होती. त्यासाठी भल्या पहाटे उठून आई- वडिलांना शेतीकामात मदत करण्यासोबतच अधिकाधिक वेळ अभ्यासाला कसा देता येईल याकडे तिचे लक्ष असायचे. मात्र दुर्दैवाने तिचे स्वप्न केवळ मृगजळ ठरले.

चार पिढ्यात पहिल्यांदा साक्षीच्या रुपाने मुलगी जन्माला आल्याने तिच्यावर सर्वांचा जीव होता.

साक्षीच्या मृत्यूचा सर्वांनाच चटका

अपघाताची माहिती समजल्यावर संपूर्ण भोजापूर खोर्‍यावर शोककळा पसरली होती. तिचे आई-वडील आजही धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. आईला आजही दिवसाकाठी एक-दोन सलाईन लावावे लागत आहेत. तर वडील कसेबसे उठून बसत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून कुटुंबातील एकही व्यक्ती घर सोडून गेलेली नाही. अशातच बारावीच्या निकालामुळे साक्षी बद्दलच्या आठवणी सर्वांच्या मनात पुन्हा दाटून आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT