नाशिक

हजारोंच्या साक्षीने पार पडला ७० धम्मचक्र प्रवर्तन दिन

CD
पान दोन मेन ---------------- 12958, 33102 फाळके स्मारक: बुद्ध स्मारकातील अभिवादन प्रसंगी उपमहापौर विलास शिंदे , भिक्खू सुगत ,भगवान दोंदे, प्रियांका दोंदे आदींसह जर्मनी आणि थायलंड येथील भंतेजी. दुसऱ्या छायाचित्रात बुद्ध स्मारक येथे अनुयायांची झालेली गर्दी. फाळके स्मारकात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात परदेशी भंतेजींच्या उपस्थितीत हजारो उपासकांचे अभिवादन; सकाळ वृत्तसेवा इंदिरानगर, ता. २० : पाथर्डी फाटा परिसरातील फाळके स्मारक येथील बुद्ध स्मारकात हजारो उपासकांच्या उपस्थितीत ७० वा ''धम्मचक्र प्रवर्तन दिन'' उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिकेतर्फे भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम पार पडले. उपमहापौर विलास शिंदे यांनी स्मारकातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. सोहळ्याला नगरसेवक भगवान दोंदे, प्रियांका दोंदे, शारदा दोंदे, थायलंड येथील डॉ. पलावधाम्मो पाणयापोंग, सुविद सवादपनीच, ओसाथाफिरोम, जर्मनी येथील सुराचाई मकमी, डेन्मार्कचे फ्रामहा विचिट सिरिपुन्नो, बांगलादेशच्या डॉ. मिथिला चौधरी, किट्टुण्या सिरीख, सिलिलुक युखंथाफोर्नफोंग, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, संदीप दोंदे, विशाल दोंदे, मोहन अढांगळे आदी उपस्थित होते. ट्रस्टचे संस्थापक भिक्खू सुगत थेरो यांनी प्रास्ताविक केले. ट्रस्टतर्फे भिक्खू संघरत्न, भदन्त यु नागधम्मो महाथेरो, भदंत रोहीत, भदंत बुद्धसिरी आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ''संकल्प युवा प्रतिष्ठान'', ''सोपान योग महाविद्यालय'', ''जीवक डेंटल क्लिनिक'', ''भारतीय बौद्ध महासंघ'', बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया'', ''रामजी सामाजिक संस्था'', ''त्रिरत्न बौद्ध महासंघ'' आदी संघटनांतर्फे अन्नदान, खीरदान व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. ------- विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर, क्षयरोग जनजागृती, सर्वोग्रह निदान शिबिर आणि वृक्षारोपण करण्यात आले. येथे आयोजित धम्मसभेसाठी प्रचंड गर्दी झाली होती. बुद्ध स्मारकातील मूर्तीच्या आणि पवित्र बोधिवृक्षाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संतोष जोंधळे आणि सहकाऱ्यांनी बुद्ध व भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. परिसरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा, बौद्ध धर्मावर आधारित साहित्याची दुकाने, खेळणी, खाद्यपदार्थ आणि मिठाईच्या स्टॉल्समुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. शहर आणि जिल्ह्यातून शेकडो युवती व युवक भीमज्योती घेऊन येथे दाखल झाले होते. ------ पोलिसांचे चोख वाहतूक नियोजन दरवर्षी पाथर्डी फाटा चौक ते बुद्ध स्मारक परिसरापर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी होते; मात्र यंदा इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक सुनील अंकोलीकर, संतोष फुंदे, अमोल मानकर, पवन परदेशी आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या सहकार्याने सर्व्हिस रोडवरील मोकळ्या भूखंडांवर वाहनांच्या पार्किंगचे उत्तम नियोजन केले. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहून कोणतीही कोंडी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

मी अजूनची चांगल्या फॉर्मात आहे, मग भारतीय संघात पुनरागमनाची आशा का सोडू? मोहम्मद शमीचं विधान चर्चेत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

SCROLL FOR NEXT