fund esakal
नाशिक

शासकीय वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी समाजकल्याणकडून साडेसात कोटी

विनोद बेदरकर

नाशिक : राज्यात समाज कल्याण विभागातर्फे (Social Welfare Department) ४४१ शासकीय वसतिगृह (Guest House) असून त्यातील ३३ वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी ५० लाखाला मंजुरी मिळाली आहे. (7.5 crore from Social Welfare Department for repair of Government Hostel Nashik news)

राज्यात विविध भागात असणा-या वसतिगृहातून अनेक नामवंत विद्यार्थी घडले आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकासाची वसतिगृहे ही केंद्र बनली आहेत. विद्यार्थांच्या जडणघडणीत योगदान वसतिगृहांचे योगदान मोठे आहे. शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका असलेल्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतींच्या दुरुस्ती करून सर्व आवश्यक सोई-सुविधांसह विद्यार्थांना निवासासाठी तसेच अभ्यासाकरिता पूरक वातावरण यामुळे उपलब्ध होणार आहे.

समाजकल्याण विभागाच्या दुरुस्तीसाठी दिलेल्या निधीतून वसतिगृहांची विविध दुरुस्ती कामे, कपाटे अद्ययावत करणे, इमारत कलरिंग करणे, कोटिंग करणे, आवार संरक्षक भिंत उभारणे, शौचालय, बाथरुम, खिडक्या, दरवाजे, तारेचे कम्पाउंड, भिंतीची दुरुस्ती, ग्राउंड फ्लोरिगं, रोलिंग, पाण्याची टाकी, स्ट्रीट लाइट, पेव्हर ब्लॉक बसविणे, टाइल्स बदलविणे, वॉटर प्रुफिंग, ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणे, बोअरवेल बांधकामाची कामे करण्यात येणार आहे.

विभाग निधी कोटी
नाशिक २४ लाख ७२
मुंबई १.८१
लातुर १.३२
अमरावती २.७८
पुणे १.२३
नागपूर २ लाख ४०
औरंगाबाद ७ लाख ८७

"राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहापैकी ३३ वसतिगृहाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव २०२१-२२ मध्ये प्राप्त झाले होते. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. सामाजिक न्याय मंत्री, सचिवांच्या पुढाकाराने ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे."
- डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा दर किती?

Viral Video : आरती सुरु असतानाच पुजाऱ्याला हृदयविकाराच्या झटका, जागेवरच मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : जयंत पाटील वर्षावर गेले, म्हणजे राजकारणात ट्विस्ट आहे; राष्ट्रवादीच्या नेत्याचं विधान

IND vs ENG 1st ODI: अक्षर पटेलची ऐतिहासिक कामगिरी! सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, युवराज सिंगसह सहा जणांशी बरोबरी

Sangli Crocodile Attack : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! मगरीने आधी खांदा पकडला, मग मानेवर झडप; पाठीत दात घुसल्याने गंभीर जखमी, 60 वर्षीय नागरिकाची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT