Accidental Tata Magic and Irtica esakal
नाशिक

Nashik Accident News: येवल्याजवळ अपघातात शहाद्याचे 8 जखमी; टाटा मॅजिक, इरटीका कारची समोरासमोर धडक

या अपघातात शहादा येथील आठ जण जखमी झाले आहेत. यात एक सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : येवला-मनमाड महामार्गावर कासारखेडे शिवारात बुधवारी (ता. २७) दुपारी टाटा मॅजिक व इरटीका या दोन वाहनांत समोरासमोर धडक झाली.

या अपघातात शहादा येथील आठ जण जखमी झाले आहेत. यात एक सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. (8 injured in Shahada accident near Yevala Tata Magic Irtiga collided head on Nashik Accident News)

दोन्ही वाहनांची समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती, की टाटा मॅजिकचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला. इरटीकाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजतात आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले.

येवला येथे तातडीने दूरध्वनी करून मदतीसाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. त्याद्वारे तातडीने रुग्णांना येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांची कमतरता असल्याने काही खासगी डॉक्टरांना या ठिकाणी बोलवून त्यांनी जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले.

शहादा (जि. नंदुरबार) येथून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना, कासारखेडा येथे इरटीका (एमएच ४३, बीई ३७७८) आणि टाटा मॅजिक यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला.

यात मनोहर हिरालाल माळी (वय ३०), रोहिदास हिरालाल बोरसे (वय ३२), हरी शिवा माळी (वय २८), जयश्री मनोहर माळी (वय २८), प्रमिला हिरालाल माळी (वय ५०), रूपाली रोहिदास बोरसे (वय ३०), भार्गवी रोहिदास बोरसे (वय ८), शिव रोहिदास बोरसे व कृष्णा मनोहर माळी (दोघे ६ महिने) जखमी झाले.

शहादा येथील अपघातातील जखमीची मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया यांच्याकडून भ्रमणध्वनीवरून चौकशी केली व येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. कृप्पास्वामी यांना जखमींवर उपचार करण्याच्या सूचना केल्या.

उपचारानंतर जखमींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने खासगी वाहनाने ते शहाद्याकडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT