late nandkumar aher esakal
नाशिक

Nashik Crime : शहरातील खूनाचे सत्र सुरूच; 18 दिवसांमध्ये आठवा खून

कुणाल संत

नाशिक : भरदिवसा हल्लेखोरांनी तलवारीने (sword) उद्योजकावर हल्ला करत त्याचा खून (Murder) केला आहे. अंबड औद्यागिक वसाहतीमधील (MIDC) सिमेन्स कंपनीजवळ ही घटना घडली. नंदकुमार आहेर (वय ५०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नंदकुमार आहेर यांच्या हत्येमुळे शहरात अठरा दिवसांमध्ये आठवा खून झाला आहे. त्यामुळे शहरातील खूनाचे सत्र (Series Of murder) थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. खूनाच्या घटनेने मात्र अंबड औद्यागिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहेत. (8th murder in 18 days series of murders in city Nashik Crime News)

अंबड औद्यागिक वसाहतीमध्ये प्रवीण आहेर यांचे आहेर इंजिनिअरींग वर्क्स नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये त्यांचे पुतणे नंदकुमार आहेर हे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करतात. मंगळवारी (ता.७) सकाळी दहाला नंदकुमार आहेर हे अंबड औद्योगिक वसाहतीतील सीमेन्स कंपनीकडून गंगाविहारकडे जात असताना सीमेन्सजवळील आहेर इंजिनिअरिंग कंपनी (एफ १८/२) येथे आले असता गाडीतून खाली उतरल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांनी त्यांच्यावर तलवारीने व इतर धारधार हत्याराने सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी करत घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात नंदकुमार आहेर गंभीर जखमी झाल्याचे दिसताच आजूबाजूच्या लोकांसह कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल केले. त्यानंतर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त दिलिप बारकुंड, अमोल तांबे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हल्लेखाराच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना करण्यात आली. यावेळी पोलीसांनी आजूबाजूला तपासणी केली असता त्यांना हल्ल्यात वापरलेली रक्ताने माखलेली तलवार मिळून आली आहे.

शहरात खूनाचे सत्र सुरुच

नंदकुमार आहेर यांच्या खूनामुळे शहरात आठवा खून झाला आहे. मागील अठरा दिवसामध्ये आठ खून झाल्याने खूनाचे सत्र शहरात सुरुच असल्याचे दिसून आले आहे. मागील दोन ते तीन दिवसात शहरातील विविध भागांत तरुणांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शहर पोलीसांकडून रात्रीचा गस्त, कोम्बिंग ऑपरेशन, आदी उपाययोजन राबविल्या जात असताना देखील मंगळवार (ता.७) आहेर यांच्या खूनामुळे पोलीसांच्या ह्या उपाययोजना फोल ठरत असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT