नाशिक

मुख्य अंकातील पानासाठी.... अवतीभवती

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी.... अवतीभवती -- अब्दुल कलाम यांना साक्रीत अभिवादन साक्री : येथील देसले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिवस’ म्हणून पाळला जातो. या प्रसंगी डॉ. कैलास वाघ यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. डॉ. कलाम यांनी शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतातील प्रचंड युवाशक्तीमुळे भारत एक दिवस नक्कीच महासत्ता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. अजय नांद्रे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अभिजीत भामरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. करूणा अहिरे यांनी आभार मानले. -- नरडाणा येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात धुळे : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य व डॉ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान वरिष्ठ तसेच आर. एम. सिसोदे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व प्रतिमा पूजन समितीतर्फे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘जागतिक विद्यार्थी दिन’ व ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष संजयकुमार सिसोदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. उपप्राचार्य प्रा. ए. आर. वसावे, उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. ए. पी. निकम, डॉ. एस. एम. सिसोदे, डॉ. सारिका पाटील, प्रा. स्वर्णदीप राजपूत, प्रा. स्वप्निल मोरे, प्रा. शुभम सांगळे, प्रा. गिरीष पवार, प्रा. राहुल जाधव, प्रा. अनिता मोरे, प्रा. सोनाली शिंदे, प्रा. योगेश्वरी सावंत, प्रा. हर्षा पाटील, प्रा. रोहिनी सिसोदे, प्रा. शिवानी लोहार, प्रा. चैताली भामरे, संजय बोरसे, शंकर सिसोदे आदी उपस्थित होते. -- ( कालची शिल्लक बातमी ) वरखेडेत मुलींसाठी मासिकधर्म प्रबोधन धुळे : नगाव एज्युकेशन सोसायटी संचलित वरखेडे (ता. धुळे) येथील गंगामाता माध्यमिक विद्यालय व कै. नगीनभाई रतन पटेल कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘सेवा सप्ताह आरोग्य’अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी विशेष प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील राज्यस्तरीय प्रशिक्षक वैशाली पाटील यांनी मासिक पाळीबद्दल समाजात असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करत विद्यार्थिनींना शास्त्रीय माहिती दिली. त्यांनी या काळात पाळावयाची स्वच्छता, योग्य आहार आणि मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थिनींनी मोकळेपणाने सहभाग घेत अनुभव मांडले. मुख्याध्यापक एस. बी. सोनवणे, शिक्षक रत्नप्रभा चव्हाण, नीता बडगुजर, स्वाती पाटील, भावना साबळे व स्वाती थोरात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांचे पंचनामे आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT