accident esakal
नाशिक

नाशिक : गाडी पलटी झाली अन् वाचले आठ गायींचे प्राण

रणधीर भामरे

वीरगाव (जि. नाशिक) : साक्री- शिर्डी महामार्गावरील वनोली (ता. बागलाण) गावाजवळ गोवंश तस्करी करणारा पिक- अप (Pick- up) पलटी झाला. या अपघातामुळे वाहनातून अवैध गोवंश वाहतूक (illegal cattle transport) करण्यात येत असल्याचे समोर आल्याने अपघातामुळे का होईना पण आठ गाईंचे प्राण वाचले.

अपघातातून बचावलेल्या गायी

पोलिसांनी पाठलाग केला अन्...

या मार्गावरील ताहाराबाद ते सटाणा दरम्यान असणाऱ्या महामार्गावर पिक- अप MH-41-G-2808) या वाहनातून गो तस्करी होत असल्याची माहिती मालेगाव येथील गोरक्षा समितीचे अध्यक्ष सुभाष मालू यांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला. पोलिस पाठलाग करत आहेत हे लक्षात आल्यावर ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. ड्रायव्हरचा भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील ताबा सुटल्याने वनोली शिवारात हे वाहन पलटी झाले. या वाहनात सुमारे आठ गाई कोंबून भरलेल्या आढळल्या. यावेळी तात्काळ पोलिसांनी कारवाई केली. सर्व जनावरे सुरक्षित असून त्यांना मालेगाव येथील पांझरापोळ येथे रवाना करण्यात आले आहे. सदरचा पिक- अप चालक फरार असून पुढील तपास पोलिस यंत्रणा करीत आहे.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गायींना पांझरापोळ येेथे रवाना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT